मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भिवंडीतील तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराला भेट

| Updated on: Mar 29, 2022 | 11:59 PM

31 मार्च हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. पात्र सर्व तृतीयपंथीय नागरिकांची नोंदणी करणे हे उद्दिष्ट ठेवून मतदार संघांतर्गत तृतीय पंथीयांची संख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार भिवंडी येथील भंडारी कम्पाऊंड आणि गायत्री नगर येथे तृतीयपंथीय मतदार विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भिवंडीतील तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराला भेट
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

ठाणे : मतदार ओळखपत्रावर तृतीयपंथीय (Transgender) असा उल्लेख ही अभिमानाची बाब आहे. हे ओळखपत्र आमच्या जगण्याला बळ देणारं आहे. आमच्या वस्तीत पहिल्यांदा मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी आले. आमच्यासाठी हा उत्सवाचा दिवस असल्याची भावना ठाणे जिल्ह्यातील तृतीयपंथी भगिनींनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांच्याजवळ व्यक्त केली. भिवंडी येथे तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला देशपांडे यांनी भेट दिली. (Chief Electoral Officer Visits Transgender Registration Special Camp in Bhiwandi)

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील भिवंडी येथे तृतीय पंथीय मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या विशेष शिबिरांना देशपांडे यांनी भेट दिली आणि तृतीयपंथी मतदारांना ओळखपत्राचे वाटप केले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, मुख्य निवडणूक अधिकारी यांचे विशेष कार्य अधिकारी दीपक पवार, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार अधिक पाटील, किन्नर अस्मिता संस्थेच्या तमन्ना केणे आदी यावेळी उपस्थित होते.

तृतीय पंथीयांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

31 मार्च हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. पात्र सर्व तृतीयपंथीय नागरिकांची नोंदणी करणे हे उद्दिष्ट ठेवून मतदार संघांतर्गत तृतीय पंथीयांची संख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार भिवंडी येथील भंडारी कम्पाऊंड आणि गायत्री नगर येथे तृतीयपंथीय मतदार विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आज राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेट दिली.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असणे आवश्यक आहे. म्हणून समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात यावे त्यांनाही लोकशाही प्रकियेत सहभागी होता यावं यासाठी त्यांची मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. मतदानाचा अधिकार हा तुम्हाला सक्षम करताना लोकशाहीमधील तुमचं महत्व अबाधित राखेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तृतीयपंथी घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी प्रत्येक तृतीयपंथी भगिनींना शुभेच्छांचे पोस्टकार्ड पाठवावे जेणेकरून मतदार नोंदणी करताना त्या कार्डचा उपयोग हा रहिवासी पुरावा म्हणून करता येऊ शकेल. तृतीयपंथी भगिनींचे मतदार नोंदणीसाठी अर्ज आल्यावर त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा, त्या मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची सूचना देशपांडे यांनी केली.

तृतीय पंथीय मतदार नोंदणी हे क्रांतिकारक पाऊल

तृतीय पंथीय मतदार नोंदणी हे क्रांतिकारक पाऊल असून ठाणे जिल्ह्यामध्ये त्यादृष्टीने चांगले काम केले आहे. जिल्ह्यात साधारणपणे सहा हजार तृतीय पंथीय असून त्यांपैकी पात्र सर्वांची मतदार नोंदणी करून त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल यादृष्टीने कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. कोविड काळात समाजातील वंचित घटकांना जावणाऱ्या समस्यांमुळे प्रशासनाला त्यांच्याकडे लक्ष देता आलं त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या, असे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. (Chief Electoral Officer Visits Transgender Registration Special Camp in Bhiwandi)

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याण डोंबिवली खाडीत अवैध रेती उपसा करणाऱ्याच्या विरोधात धडक कारवाई

पालघरमधील हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या