ठाण्यात पहाटे कंटनेर आणि एसटीची जोरदार धडक, वाहक आणि महिला प्रवासी जखमी

पावसामुळे वातावरणात कमी दृश्यमानता असल्याने सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास एसटीची कंटेनरशी धडक झाली. 

ठाण्यात पहाटे कंटनेर आणि एसटीची जोरदार धडक, वाहक आणि महिला प्रवासी जखमी
msrtc thane to borivali
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 08, 2023 | 1:12 PM

मुंबई : एसटी महामंडळाच्या ठाणे ते बोरीवली जाणाऱ्या बसची एका कंटेनरशी धडक झाल्याने कंडक्टरसह दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ठाणे – घोडबंदर इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत कंडक्टर आणि एका महिला प्रवाशाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने त्यांना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) एसटी बस ( क्र. MH 14 BT 4489 ) ठाणे एसटी बस डेपो येथून बोरवलीला जात असताना तिची धडक एका कंटेनरशी झाल्याने एसटीचा पुढील भाग क्षतिग्रस्त झाला. या अपघातात चालक संदीप पाटील ( वय 37 )आणि वाहक अमर परब ( वय 38 ) यांच्यासह एक महिला प्रवासी जखमी झाली. जखमींना कळवा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. एसटीत नऊ प्रवासी प्रवास करीत होते. त्यात चार महिला आणि पाच पुरुष प्रवासी प्रवास करीत होते.

पहाट साडे पाचच्या सुमारास हा अपघात घडला असून अपघातानंतर कंटेरन चालक घटनास्थळावरुन पळून गेल्याची माहीती सूत्रांनी दिली. या बसमध्ये नऊ प्रवासी होते. अपघातात वाहक अमर परब ( रा. भांडुप ) आणि डोंबिवली आयरे गाव येथे राहणाऱ्या महिला प्रवासी गीता कदम ( वय ४१ ) यांच्या दोन्ही पायांना फ्रक्चर झाले असून त्यांना कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा पाहा व्हिडीओ…

पावसामुळे वातावरणात कमी दृश्यमानता असल्याने सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास एसटीची कंटेनरशी धडक झाली.  ठाणे पश्चिमेकडील पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे- घोडबंदर वाहिनीवर ज्युपिटर हॉस्पिटलसमोर, लक्ष्मी- चिरागनगर येथे हा अपघात घडला. त्यानंतर कापूरबावडी पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दोन पिकअप वाहनासह घटनास्थळी हजर झाले.

वाहतूकीवर परिणाम 

अपघातामुळे या ठिकाणची वाहतूक एका लेनवरून धिम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आले असून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. या अपघाताचा तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत. एसटीच्या समोर धावत असलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनरचा चालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे.

msrtc bus thane depot to borivali