सोशल मीडिया स्टारच्या घराबाहेर धडाधड गोळीबार, एकच धावाधाव, पोलिसांवरही आरोपींचा हल्ला, पुढं घडलं काय?

Nadeem Khan Mumbra Social Media Star: सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. तर याप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही गोळीबार झाल्याने खळबळ उडाली.

सोशल मीडिया स्टारच्या घराबाहेर धडाधड गोळीबार, एकच धावाधाव, पोलिसांवरही आरोपींचा हल्ला, पुढं घडलं काय?
नदीम खान
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 07, 2026 | 1:02 PM

Nadeem Khan Mumbra Social Media Star: ठाण्याजवळ असणाऱ्या मुंब्रा कौसा भागात पहाटे पावणे पाचच्या सुमारास नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान (वय 45 )यांच्या घराबाहेर गाडीवरती एक बुलेट फायरिंग व हवेत दोन बुलेट फायरिंग करण्यात आली आहे. नदीम खान हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याच्या अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच आरोपीस पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर देखील दोन राऊंड फायरिंग केली मात्र यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. जखमी दोन जणांना जवळपास असणाऱ्या काळसेकर रुग्णालयात हलवण्यात आले.

मुंब्रा पोलिसांनी शिताफिने आरोपी शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी वय 28 याला अटक केली असून एक आरोपी फरार आहे. नदीम खान यांच्या घराच्या बाहेर मुंब्रा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नदीम खान याचा मुंब्र्यात कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून फायरिंग कशामुळे केली याचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

बिष्णोई टोळीशी कनेक्शन?

मुंब्रा येथील सोशल मीडिया इन्फ्ल्यूंसर नदीम खान यांच्या घराखाली फायरिंग प्रकरणात दोन आरोपींना अटक केलेली आहे. या फायरिंग मध्ये दोन दोन जखमी झाले आहेत. बिष्णोई टोळीचा या संदर्भात धागेदोरे आहे का याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहे. आरोपी शहाबाज कुरेशी सह एकला अटक केली आहे. एकूण पाच बुलेट फायरिंग आरोपींने केली असून मुंब्रा पोलिसांनी आरोपी कडून शस्त्रासह चार मॅक्झिन ताब्यात घेण्यात आलेली आहे. फायरिंग करत असताना प्रत्यक्षदर्शी यांनी आणि पोलिसांनी जीवाची परवा न करता आरोपीला पकडले आहे.

शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी हा मुंब्रा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर दिल्लीतील जाफराबाद परिसरातील चार पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच यापूर्वी तो तिहार तुरुंगातून आठ वर्षे शिक्षा भोगून आला आहे. तर घटनेनंतर नदीम खानच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून आरोपींनी हा गोळीबार का केला याची चौकशी आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow Us