VIDEO: ठाण्यात दहीहंडी बांधताना गोविंदा पडला, प्रकृती गंभीर, मुख्यमंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा

| Updated on: Aug 20, 2022 | 5:23 PM

या सीसीटीव्हीत दहीहंडीची तयारी सुरु असल्याचे दिसते आहे. सगळे गोविंदा रस्त्याच्या मधोमध उभे राहून हंडी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावेळी एक शिडी घेऊन त्यावर चढणारा एक तरुण दिसतो आहे. हा तरुण वरती हंडी बांधण्यासाठी गेल्यानंतर, काही क्षणातच ही शिडी कोसळली, त्यामुळे हा तरुणही वरतून खाली काही क्षणात पडल्याचे दिसते आहे. कुणाला काही कळायच्या आतच हा प्रकार घडल्याने सगळेजण भांबवून गेल्याचेही या व्हिडीओत दिसते आहे.

VIDEO: ठाण्यात दहीहंडी बांधताना गोविंदा पडला, प्रकृती गंभीर, मुख्यमंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा
हंडी बांधताना गोविंदाला मोठा अपघात
Follow us on

ठाणे- दोन वर्षानंतर साजरा होत असलेल्या दहीहंडीसाठी (Dahi handi)गोविंदा जय्यत तयारी करत असतानाच ठाण्यात घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली. ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रभात सिनेमा शेजारील भंडारआळी येथे दहीहंडीची तयारी करण्यात येत होती. सर्व गोविंदा उत्साहाने कामाला लागलेले असतांनाच संतोष शिंदे हंडी बांधायला शिडीवर चढला होता. त्याचवेळी कोणाच्या ध्यानीमनी नसताना अनर्थ घडला. संतोष शिंदे अचानक शिडीवरून खाली रस्त्यावर पडला ( fall down)आणि त्याला जबर मार बसला. अत्यंत अत्यवस्थ परिस्थितीत संतोष याला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची स्थिती गंभीर (critical condition)असल्याचे समजते. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर, आता संतोषच्या अपघाताबाबत हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.

काय आहे सीसीटीव्ही फूटेजमध्ये

या सीसीटीव्हीत दहीहंडीची तयारी सुरु असल्याचे दिसते आहे. सगळे गोविंदा रस्त्याच्या मधोमध उभे राहून हंडी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावेळी एक शिडी घेऊन त्यावर चढणारा एक तरुण दिसतो आहे. हा तरुण वरती हंडी बांधण्यासाठी गेल्यानंतर, काही क्षणातच ही शिडी कोसळली, त्यामुळे हा तरुणही वरतून खाली काही क्षणात पडल्याचे दिसते आहे. कुणाला काही कळायच्या आतच हा प्रकार घडल्याने सगळेजण भांबवून गेल्याचेही या व्हिडीओत दिसते आहे. हा तरुण पडल्यानंतर त्याच्या अवतीभवोती सगळे गोविंदा जमा झाल्याचेही पाहायला मिळते आहे. या अपघातात संतोष शिंदे याला जबर मार लागला आहे. त्यानंतर तातडीने त्याला जवळच असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असले तरी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदतीची अपेक्षा

या सर्व घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केल्याप्रमाणे संतोष याच्या कुटुंबियांना अपघाती विम्याचे पैसे मिळावेत, अशी मागणी संतोष यांचे कुटुंबिय आणि मित्र परिवाराने केली आहे. दहीहंडीच्या वेळी मानवी थर रचताना अपघात होतात. मात्र हा अपघात अत्यंत दुर्देवी पद्धतीने झाला आहे. हंडी बांधण्यासाठी तयारी करत असताना झआलेल्या या अपघाताबाबत ठाण्यात हळहळ व्यक्त होते आहे.