Eknath Shinde : कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला मोठा झटका, ‘एकदा मी शब्द दिला की…’

Eknath Shinde : "बेस्टची पतपेढीची निवडणूक बॅलेटवर झाली, इथे काय म्हणणार?. ईव्हीएमवर शंका घेतात, लोकसभा जिंकली, तेव्हा ईव्हीएम, निवडणूक आयोग चांगला आणि हरल्यावर ईव्हीएम खराब. शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेन ठरवलेलं आहे. महायुतीने केलेल्या कामाला विधानसभेला पोचपावती मिळाली. यापुढच्या निवडणुकीत जनता पोचपावती देईल" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला मोठा झटका, एकदा मी शब्द दिला की...
Eknath Shinde
| Updated on: Aug 20, 2025 | 2:33 PM

स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे. ठाकरे गटातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. “कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेत सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो. पदाधिकारी, सरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, ते स्वगृही आलेले आहेत. त्यांना तिथे करमत नव्हत आणि मलाही त्यांच्यावाचून करमत नव्हतं” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “खरं म्हणजे पदाधिकारी असले, तरी गेल्या अनेक वर्षापासून एक कौटुंबिक नात होतं. खासदार श्रीकंत शिंदे यांच्या मतदारसंघात हे पदाधिकारी काम करतात. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“विकासाला प्राधान्य देणं महायुतीचा अजेंडा आहे. सर्वसामान्य लोकांच जीवनमान उंचावणं. शासनाच्या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात बदल घडवणं हा आमचा उद्देश, अजेंडा आहे. आमचा अजेंडा दुसरा काही नसून, कल्याणकारी राज्य हाच आमचा अजेंडा आहे. म्हणून हे सर्व पदाधिकारी एका विश्वासाने आले आहेत. त्यांच्या संपूर्ण भागाचा विकास ज्या पद्धतीने झालेला आहे, अनेक काम असतील. तिथले प्रश्न असतील, शासन कुठेही कमी पडणार नाही. त्यांच्या पाठिशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

‘काही कमी पडणार नाही हा शब्द दिलाय’

“कल्याण-डोंबिवलीत शिवसेना मजबूत होती, आता ती आणखी मजबूत होईल. काही कमी पडणार नाही हा शब्द दिलाय. शब्द दिला की, मी तो खरा करतो हे महाराष्ट्राने पाहिलय, त्यांचा विश्वास शिवसेना सार्थ ठरवेल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “शिवसेना मजबूत आहे, आणखी बळकट होईल. सर्व लोकांच्या येण्याने अधिक विस्तार होईल. लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली. आता स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकेल, प्रचंड मोठा विजय महायुतीला मिळेल” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार’

“खरं म्हणजे पुढे जाणार की, मागे जाणार हे जनता ठरवत असते. महाराष्ट्रातील जनता ठरवेल. काम करणाऱ्यांना पुढे नेणार आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार. लोकांना काम करणारे लोक पाहिजेत. मविआ स्थगिती सरकार होतं, आम्ही ते सर्व स्पीड बेकर हटवले. समृद्धी सरकार आणलं” असं एकनाथ शिंदे म्हणाले.