KDMC : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर, गर्भवती महिला सेफ्टी टॅंकमध्ये पडल्याने गंभीर जखमी

| Updated on: Aug 04, 2022 | 10:20 AM

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या डागडुजीकडे सततचे दुर्लक्ष केले जात आहे. मोहने येथील लहुजी नगर या दलित बहुल वसाहतीत शौचालयाच्या भांड्यासह कमकुवत भाग सेफ्टी टॅंकमध्ये कोसळल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी घडली.

KDMC : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर, गर्भवती महिला  सेफ्टी टॅंकमध्ये पडल्याने गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर, गर्भवती महिला सेफ्टी टॅंकमध्ये पडल्याने गंभीर जखमी
Image Credit source: tv9marathi
Follow us on

कल्याण – कल्याण (Kalyan) मोहने लहुजी नगर दलित बहुल वसाहतीत महानगरपालिकेने (KDMC) बांधलेल्या सार्वजनिक शौचालयात विधीसाठी गेलेली गर्भवती महिला कमकुवत झालेले शौचालयाच्या भांड्यासह सेफ्टी टॅंकमध्ये पडली. तब्बल 20 मिनिट सेफ्टी टॅंकच्या (Safety Tank) गाळात रुतल्याने बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आरडाओरड केली. तिथल्या नागरिकानी संबंधित आवाज ऐकून महिलेला काढून जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल केले. 48 तास होऊन पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या काळात पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तिथल्या नगरसेवकाच्या विरोधात मतदान होण्याची शक्यता आहे.

जीव वाचवण्याकरता मदतीसाठी आरडाओरड केली

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या डागडुजीकडे सततचे दुर्लक्ष केले जात आहे. मोहने येथील लहुजी नगर या दलित बहुल वसाहतीत शौचालयाच्या भांड्यासह कमकुवत भाग सेफ्टी टॅंकमध्ये कोसळल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी घडली. सकाळी साडेसहाच्या सुमारास 22 वर्षीय उमा रिठे नावाची गर्भवती महिला विधीसाठी गेले असता अत्यंत कमकुवत झालेले शौचालयाच्या भांड्यासह भाग कोसळून सदरहू महिला सेफ्टी टॅंकमध्ये पडली. गर्भवती असलेली महिलेने कसेबसे स्वतःला सावरत सेफ्टी टॅंकमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र ती गाळात रुतल्याने तिला बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले याच दरम्यान तिने आपला जीव वाचवण्याकरता मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात करू लागली.

हे सुद्धा वाचा

खासगी रुग्णालयात उपचार सुरु

शौचालयाच्या नजीक राहत असणाऱ्या एका नागरिकाने तिचा आवाज ऐकल्याने घटनास्थळी जात सेफ्टी टॅंकमध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेला मोठ्या शिताफीने बाहेर काढले. मात्र या दुर्घटनेत गर्भवती महिलेस इजा झाली असून तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. परिसरातील महिलांनी अनेक वेळा तक्रार करून पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष देत असून या घटनेला 48 तास होऊन पालिकेच्या कोणत्या प्रकारची हालचाल नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी पालिकेने नवीन शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.