Ketaki Chitale: महाराष्ट्राचा ‘बीपी’ वाढवणाऱ्या केतकी चितळेचा बीपीही घसरला, केतकी म्हणते, माझा Low च असतो!

केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सात जूनपर्यंत केतकी न्यायालयीन कोठडीत असेल. केतकीविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे.

Ketaki Chitale: महाराष्ट्राचा बीपी वाढवणाऱ्या केतकी चितळेचा बीपीही घसरला, केतकी म्हणते, माझा Low च असतो!
Ketaki Chitale
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 3:14 PM

एका फेसबुक पोस्टवरून गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राचा ‘बीपी’ वाढवणारी अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) नुकताच मेडिकल चेकअप (Medical Check Up) करण्यात आला. केतकीची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (24 मे) तिला न्यायालयीन कोठडी (Judicial Custudy) सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी तिची मेडिकल चेकअप करण्यात आला. हा चेकअप करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. केतकी गेल्या दहा दिवसांपासून ती पोलीस कोठडीत आहे. डॉक्टरने तिचा रक्तदाब चेक केला असता त्यांना तो कमी असल्याचा आढळला. मात्र त्यावर ‘माझी बीपी लोच असतो’, असं ती म्हणाली. त्यादिवशी मात्र बरोबर होतं, असं डॉक्टर तिला पुढे म्हणतात. तेव्हा ती हसत त्यांना सांगते, “त्यादिवशी आम्ही धावत आलो होतो. तेव्हा सगळ्यांचा बीपी चेक केला असता तर 200 च्या वरच असता.”

केतकी प्रकरणावरून राज्यात वादंग उठलं होतं. राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातून तिच्याविरोधात प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी तिच्यावर सडकून टीका केली. इतकंच नव्हे तर जेव्हा तिला अटक करण्यात आली, तेव्हा तिच्यावर शाईफेकही करण्यात आली. या सर्व घटनांनंतरही केतकीची आजची देहबोली बरीच सकारात्मक होती. डॉक्टर आणि पोलिसांशी ती हसत बोलत होती.

पहा केतकीचा व्हिडीओ-

केतकी चितळेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सात जूनपर्यंत केतकी न्यायालयीन कोठडीत असेल. केतकीविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केल्याने केतकीला 14 मे रोजी रबाळे पोलिसांनी अटक केली होती. तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. आज (24 मे) झालेल्या सुनावणीनंतर केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने अनेक धर्मांचा उल्लेख केला होता. नवबौद्धांवरची तिची मतं तिने या पोस्टद्वारे मांडली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात तिला याआधी 20 मे रोजी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.