बारच्या बाहेर सावित्रीबाई फुलेंचा फोटो, शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी झापताच छायाचित्र हटवलं

| Updated on: Mar 09, 2022 | 5:47 PM

शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेतली. या ठिकाणी सावित्रीबाईंचे छायाचित्र बारवर लावल्याबद्दल तीव्र आक्षेप घेत बार मालकाला जाब विचारला.

बारच्या बाहेर सावित्रीबाई फुलेंचा फोटो, शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी झापताच छायाचित्र हटवलं
कल्याणमधील बारबाहेर सावित्रीबाईंचा फोटो
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

कल्याण : बारच्या (Bar) प्रथमदर्शनी भिंतीवर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचं छायाचित्र लावल्याने वाद निर्माण झाला होता. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराच्या (Kalyan) पूर्व भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत बार चालकाने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ असा संदेश देण्यासाठी बारच्या प्रथमदर्शनी भागावर सावित्रीबाई फुलेंचं छायाचित्र लावलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या संतप्त महिला पदाधिकाऱ्यांनी बार व्यवस्थापनाला या प्रकाराचा जाब विचारला. अखेर सावित्रीबाईंचं छायाचित्र काढण्यात आलं. बार मालकाने माफी मागितल्याचंही समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण पूर्वेकडील विजय नगर येथील फूड किंग डायनिंग ॲण्ड बारच्या प्रथमदर्शनी भागावर सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावण्यात आला होता. महिला दिनाचं औचित्य साधत बार चालकाने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ असं नमूद करत बारच्या प्रथमदर्शनी भागावर सावित्रीबाई फुलेंचे छायाचित्र लावलं होतं.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी झापलं

या प्रकारामुळे चांगलाच वाद पेटला .याची माहिती मिळताच शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेतली. या ठिकाणी सावित्रीबाईंचे छायाचित्र बारवर लावल्याबद्दल तीव्र आक्षेप घेत बार मालकाला जाब विचारला.

बार मालकाची दिलगिरी

बार मालकाने आणि व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त करुन माफी मागितली. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र त्वरीत तेथून हटवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या :

मुल्हेर गडावरील तोफांना नवसंजीवनी! दरीतील तोफा सह्याद्री प्रतिष्ठानने गडावर आणल्या

 जन्मठेपेच्या फरार कैद्याला 23 वर्षांनी बेड्या, उल्हासनगर क्राईम ब्रॅंचची सापळा रचून कारवाई

शिळफाटा-महापे रोडवर आगीचे लोट, भंगाराच्या गोदामाला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल