VIDEO: ‘अचानक गाय खाली पडते आणि अवघ्या 2 मिनिटात मृत्यू’, भिवंडीत शेतकऱ्याच्या 15 गायींच्या मृत्यूनं खळबळ

| Updated on: Sep 05, 2021 | 10:18 AM

शेती व्यवसाय आतबट्याचा खेळ झालेला असताना शेतकऱ्यांसाठी दुधव्यवसाय मोठा आधार देणारा ठरत आहेत. मात्र, त्यातही नवनवीन अडचणी येत असतात. ठाण्यातील भिवंडी तालुक्यात असंच एक उदाहरण पाहायला मिळालं. भिवंडी तालुक्यातील देवरूग येथे हरीचंद्र केणे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील एकूण 21 गायींपैकी 15 गायींचा अचानक मृत्यू झाला.

VIDEO: अचानक गाय खाली पडते आणि अवघ्या 2 मिनिटात मृत्यू, भिवंडीत शेतकऱ्याच्या 15 गायींच्या मृत्यूनं खळबळ
Follow us on

सुनिल घरत, टीव्ही 9 मराठी, ठाणे : शेती व्यवसाय आतबट्याचा खेळ झालेला असताना शेतकऱ्यांसाठी दुधव्यवसाय मोठा आधार देणारा ठरत आहेत. मात्र, त्यातही नवनवीन अडचणी येत असतात. ठाण्यातील भिवंडी तालुक्यात असंच एक उदाहरण पाहायला मिळालं. भिवंडी तालुक्यातील देवरूग येथे हरीचंद्र केणे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील एकूण 21 गायींपैकी 15 गायींचा अचानक मृत्यू झाला. शिल्लक राहिलेल्या 6 गायींची प्रकृती देखील नाजूक आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलं आहे. या परिस्थितीत शासनाने मदत करावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यानं केलीय.

15 गायींचा मृत्यू, मात्र, आजाराचं निदान नाही, अहवालाची प्रतीक्षा

शेतकऱ्याच्या गोठ्यातील एकूण 15 गायींचा एका आठवड्यात मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या गायींचा मृत्यू नेमका कोणत्या आजारानं झाला आहे याचं निदान अद्याप झालेलं नाही. पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांनी घटनास्थळी जाऊन एका गाईचं शवविच्छेदन (PM) करण्यात आलं. तसेच नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यानंतरच गायींच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.

शिल्लक राहिलेल्या 4 गाई आणि 2 वासरांनाही लागण, शेतकरी उद्ध्वस्त

पुण्यातून अहवाल येईपर्यंत पीडित शेतकऱ्याच्या गोठ्यात एकही गाय शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आहे. हरीचंद्र केणे यांच्या तबेल्यात वासरांसह एकूण 21 गायी होत्या. त्यापैकी 15 गायींचा मृत्यू झाला. शिल्लक राहिलेल्या 4 गाई आणि 2 वासरे यांनाही या आजाराची लागण झालीय. या जनावरांचीही परिस्थिती नाजूक आहे. या आजारानं गाय अचानक खाली पडते आणि अगदी दोन मिनिटात गाईचा मृत्यू होतोय.

शिवसेनेकडून पीडित शेतकऱ्याला मदतीची मागणी

शेतीसोबत आर्थिक मदत व्हावी म्हणून हरीचंद्र केणे यांनी दुधाचा जोडधंदा सुरू केला होता. मात्र, बघता बघता गोठ्यातील 15 गायींचा मृत्यू झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घटना स्थळी शिवसेनेना ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत करण्याची मागणी प्रशासनाकडे केलीय. त्यांच्या सोबत भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, अॅड विजय दिवाणे हेही उपस्थित होते.

हेही वाचा :

शेतकऱ्यांवर नवं संकट, पालघरमध्ये गाई-बैलांसह जनावरांना ‘या’ रोगाची लागण, शेती कामं रखडली

VIDEO: गाईनं घर पोसलं, धुळ्यात सर्पदंशाने मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याकडून माणसाप्रमाणे वाजतगाजत अंत्ययात्रा

औरंगाबादमध्ये शेतात विजेची तार कोसळली, शेतकऱ्याच्या 7-8 गाईंचा हकनाक मृत्यू

व्हिडीओ पाहा :

New disease in cow 15 animals of farmer dead in Bhiwandi