AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur | ‘वाहतुकीचा नियम मोडलात ? गुलाब घ्या गुलाब,’ ‘नो चलान डे’निमित्त बदलापूर पोलिसांकडून जनजागृती

नियम मोडणारा वाहनचालक दिसला की त्याला बाजूला घेतलं जात होतं. मात्र त्याच्याकडून दंड घेतला जात नव्हता. तर चक्क गुलाबाचं फुल देऊन त्याच्यासोबत फोटोसेशन केलं जात होतं. तसेच पुढच्या वेळी चूक करू नका, अशी गोड समज दिली जात होती.

Badlapur | 'वाहतुकीचा नियम मोडलात ? गुलाब घ्या गुलाब,' 'नो चलान डे'निमित्त बदलापूर पोलिसांकडून जनजागृती
BADLAPUR TRAFFIC POLICE
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 8:13 AM
Share

ठाणे : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी अडवलं, की किमान 100 रुपयांची पावती फाटणारच, हे ठरलेलं असतं. मात्र बदलापुरात आज काहीसं उलटं चित्र पाहायला मिळालं. कारण नियम मोडणाऱ्यांना पावती नव्हे, तर चक्क गुलाबाचं फुल देत वाहतूक पोलिसांनी समज दिली. पोलिसांनी गुलाबाचे फुल देत वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहान प्रवाशांना केले.

चक्क गुलाबाचं फुल देऊन प्रवाशांना समज 

बदलापुरात शहरात आज वाहतूक पोलिसांचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं. याला निमित्त होतं ते “नो चलान डे” चं. बदलापूरच्या गांधी चौक आणि स्टेशन परिसरात आज सकाळपासून वाहतूक पोलीस बंदोबस्तावर होते. नेहमीप्रमाणे एखादा नियम मोडणारा वाहनचालक दिसला की त्याला बाजूला घेतलं जात होतं. मात्र त्याच्याकडून दंड घेतला जात नव्हता. तर चक्क गुलाबाचं फुल देऊन त्याच्यासोबत फोटोसेशन केलं जात होतं. तसेच पुढच्या वेळी चूक करू नका, अशी गोड समज दिली जात होती.

रिक्षाचालकांनाही नियम पाळण्याचं आवाहन

राज्य सरकारनं वाहतूक विभागाचे नियम बदलले असून आता दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांमध्ये जनजागृती करून त्यांना नियम पाळण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं. तर रिक्षाचालकांनाही नियम पळून रिक्षा चालवण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र ही गोड भाषा नियम मोडणाऱ्यांना किती दिवस लक्षात राहते, हेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे. अन्यथा पुढच्या वेळी मात्र पावती फाडावी लागणार आहे.

वाहतूक नियमांसंदर्भात 15 ते 20 मिनिटे समुपदेशन

दरम्यान, नो चलान डेच्या निमित्ताने ठाण्यात वाहतूक पोलिसांनी जनजागृती केली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील अशा 10 ते 15 वाहन चालकांचे गट तयार करून त्यांना महत्वाच्या ठिकाणी नेऊन त्यांचे वाहतूक नियमांसंदर्भात 15 ते 20 मिनिटे समुपदेशन करण्यात आले. त्यांना वाहनांची कागदपत्रे तपासून अपूर्ण कागदपत्रांची जाणीव करून देण्यात आली.

इतर बातम्या :

Nitesh Rane | ‘हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस,’ जागोजागी नितेश राणेंच्या फोटोचे बॅनर, नवा वाद पेटणार ?

Pune Traffice Update | कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त पुण्यात वाहतूक नियमांत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते ?

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; पोलिसांकडून मुंबईत येणाऱ्या वाहनांची तपासणी

Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान