Pune Traffice Update | कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त पुण्यात वाहतूक नियमांत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते ?

Pune Traffice Update | कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त पुण्यात वाहतूक नियमांत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते ?
डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद

पुणे शहर प्रशासनाने वाहतूक खोळंबू नये यासाठी वाहतूक नियमांत काही बदल केले आहेत. हा बदल 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीनिमित्त असणार आहे. आज संध्याकाळपासून लष्कर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता बंद असेल तर शनिवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या बदलांमुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

अश्विनी सातव डोके

| Edited By: prajwal dhage

Dec 31, 2021 | 7:45 AM

पुणे : 2021 वर्ष सरत आले असून 2022 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी (New Year) मोठी तयारी सुरु आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या पार्ट्या तसेच जल्लोष केला जातो. तसेच पुणे जिल्ह्यात दरवर्षी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी आंबेडकरी अनुयायी राज्यातून कोरेगाव भीमा येथे शौर्यदीन साजरा करण्यासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर पुणे शहर प्रशासनाने वाहतूक खोळंबू नये यासाठी वाहतूक नियमांत काही बदल केले आहेत. हा बदल 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीनिमित्त असणार आहे. आज संध्याकाळपासून लष्कर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता बंद असेल तर शनिवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या बदलांमुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

पुणे शहरातील बंद रस्ते व पर्यायी मार्ग

वाय जंक्‍शनवरुन महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ही वाहतूक कुरेशी मशीद, सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात आली आहे.

ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

व्होल्गा चौकाकडून महमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद. सदरची वाहतूक ईस्ट स्ट्रीट रोडने सरळ इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.

इंदिरा गांधी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद. सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकाकडून लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात आली आहे.

सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद. ही वाहतूक ताबुत स्ट्रीटमार्गे पुढे जाईल.

नो-व्हेईकल झोन (31 डिसेंबर सायंकाळी सात ते 1 जानेवारी 20222 पहाटे 5 पर्यंत)

फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता – नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक चौक) ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार

जंगली महाराज रस्ता – झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक

महात्मा गांधी रस्ता – हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक (पुलगेट चौकीपर्यंत)

शनिवारी (ता. 1) छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तात्पुरत्या स्वरुपात बंद. पर्यायी रस्ते

पुरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी टिळक रस्त्याने टिळक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने पुढे जावे.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स.गो.बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक रस्त्याने पुढे जावे.

स.गो.बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणारी वाहतूक स.गो.बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौकमार्गे महापालिका भवनकडे जातील

अप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ही वाहतूक बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जाईल.

इतर बातम्या :

Nitesh Rane | ‘हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस,’ जागोजागी नितेश राणेंच्या फोटोचे बॅनर, नवा वाद पेटणार ?

Maharashtra News Live Update : पुणे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण, प्रशासन सज्ज

Disha Patani : मालदीवमधला दिशा पाटनीचा बोल्ड अवतार, हे फोटो पाहिले का?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें