मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग (Corona Patients) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. रुग्णसंख्येचा आलेख रोज वाढत असताना दिसतोय. तसेच कोरोना विषाणूचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचादेखील (Omicron) मोठ्या प्रमाणात फैलाव होताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर राज्यात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम (Corona Rules) पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे. तसेच दुसरीकडे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेशदेखील सरकारने प्रशासनाला दिलेयत. नववर्ष (New Year 2022) आगमनासाठी नागरिक सज्ज आहेत. सरत्या वर्षाला निरोप तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी मोठा जल्लोष केला जातो. पार्ट्यांचे आयोजन (New Year Party) केले जाते. मात्र कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पार्टी, जल्लोष यांच्या निमित्ताने कोणी गर्दी केली तर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona Virus) विस्फोट पाहायला मिळत आहे. कारण राज्यात आज तब्बल 8 हजार 67 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत 5 हजार 428 कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव आता दुपटीने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी 5 हजार 300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज एका दिवसात ही संख्या जवळपास साडे आठ हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 8 हजार 67 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 766 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 66 लाख 78 हजार 821 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 75 हजार 592 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 79 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2022 नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या, संपूर्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.
रत्नागिरी - आमदार शेखर निकम कोरोना पाॅझिटीव्ह
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शेखर निकम यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिली
माझी प्रकृती उत्तम आहे, काळजी करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी जनतेला कळविले आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करावी, असेही त्यांनी कळविले आहे.
बीड: संभाजी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी
भिडे गुरुजी एका कार्यक्रमाला येणार असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक
माजलगावात तणाव, घटनास्थळी पोलीस दाखल
तणाव पाहता भिडे गुरुजी यांचा कार्यक्रम रद्द
संभाजी ब्रिगेड, आंबडेकरी कार्यकर्ते रस्त्यावर
कार्यक्रम रद्द झाल्याने कार्यकर्ते पांगले
नाशिक - 22 वर्षीय विद्यार्थिनीची कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या
नाशिकच्या श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील काल दुपारची घटना
ty bams या वर्षात शिकत होती
आत्महत्येमागिल कारण अस्पष्ट
पंचवटी पोलिसांकडून पुढील तपास सुरू
पुणे : ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन
नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर करण्याची मागणी
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांचा बेमुदत संपाचा इशारा
राज्यातील सरकारी रुग्णालये आणि कॉलेजेसमधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा दिलाय इशारा
औरंगाबाद : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत चिकन मटणच्या दुकानावर गर्दी
औरंगाबादकर नागरिकांनी केली चिकन मटणच्या दुकानावर गर्दी
चिकन, मटण, मच्छी घेण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड
औरंगाबादकरांचा 31st दणक्यात होणार साजरा
नाशिक - कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
गेल्या 24 तासांत 82 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
तर ऍक्टिव्ह पेशंटचा आकडा देखील 500 पर्यंत पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली
एकीकडे ओमायक्रोनचा पहिला रुग्ण शहरात सापडला असताना दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या देखील वाढत असल्याने धोका वाढला
पुणे - येरवड्यात पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी केला हवेत गोळीबार
- सराईत तडीपार गुन्हेगारास पकडण्यासाठी गेल्यावर शिकलगार समाजाने पोलिसांवर केला हल्ला
- स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केला हवेत गोळीबार
- येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक - नवं वर्षाचं स्वागत घरातच करा, नाशिक पोलिसांचं आवाहन
31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर बंदी
रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत असणार जमावबंदी
कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रशासन हाय अलर्टवर
शहरात आज राहणार तगडा बंदोबस्त
नाशिक- येवल्यात चाकूने भोसकून फळविक्रेता तरुणाचा खून
- थर्टी फस्टच्या आदल्या दिवशी येवला शहरातील धक्कादायक घटना
- दारू पिल्यानंतर दोघांमध्ये तुंबळ भांडणे
- भांडणाच्या रागामध्ये दुसऱ्या फळ विक्रेत्याने चाकूने वार करत केला खून
- मनोज कुमार असे खून झालेल्या फळ विक्रेत्याचे नाव
- येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : विदर्भात गेल्या 24 तासांत 52 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
- बऱ्याच दिवसानंतर विदर्भात एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूने वाढवली चिंता
- विदर्भात सर्वाधिक 28 रुग्णांची नोंद एकट्या नागपूर जिल्हयात
- गोंदियात चार तर बुलढाण्यात दोन नव्या कोरोना रुग्णाची नोंद
- विदर्भात गेल्या 24 तासांत आठ रुग्ण झाले कोरोनामुक्त
नागपूर - आज नागपुरातील बार रात्री बारापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी
- रेस्टॅारंटंही रात्री बारापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी
- प्रशासनाच्या नव्या आदेशानं मद्यप्रेमिंमध्ये आनंद
- इतर दुकानं रात्री 9 पर्यंत सुरु ठेवण्याची पारवानगी
- पार्टी, डिजेला बंदी, पोलिसांची असणार नजर
पुणे : जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण
ओमिक्रॉन आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन पुन्हा एकदा सज्ज
कुठल्याही परिस्थीतीचा सामना करण्यासाठी 15 हजार 575 ऑक्सिजन खाटा, 3 हजार 337 अतिदक्षता विभागातील खाटा तर 1 हजार 825 व्हेंटिलेटर सज्ज
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती
पुणे : लोहगाव विमानतळावरून नव्या वर्षात आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार
नवीन वर्षांत पुण्याहून दुबईसाठी उड्डाण सुरू करण्यास एका विमान कंपनीने तयारी दर्शवली
तसेच पूर्वेकडील अन्य देशात उड्डाणांसाठी विमान कंपन्यांशी चर्चा सुरू
याशिवाय लोहगाव विमानतळ येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या टर्मिनलचे कामही नव्या वर्षांत पूर्ण होऊन ते प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार
राज्यात कडक निर्बंध लागणार
- सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत.
- अंत्यसंस्कारासाठी 20 लोक
- स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू
Published On - Dec 31,2021 6:24 AM