केडीएमसी घनकचरा प्रकल्पाची पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दखल, तोच पॅटर्न आता पिंपरीतही राबवला जाणार

| Updated on: Jul 09, 2021 | 2:30 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाची पिंपरी चिंचवड महापालिकेने दखल घेतली आहे (Pimpri Chinchwad Municipal Commissioner Rajesh Patil appreciate work of KDMC).

केडीएमसी घनकचरा प्रकल्पाची पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दखल, तोच पॅटर्न आता पिंपरीतही राबवला जाणार
केडीएमसी घनकचरा प्रकल्पाची पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दखल, तोच पॅटर्न आता पिंपरीतही राबवला जाणार
Follow us on

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाची पिंपरी चिंचवड महापालिकेने दखल घेतली आहे. पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केडीएमसीच्या घनकचरा प्रकल्पाची पाहणी करुन कौतूक केले आहे (Pimpri Chinchwad Municipal Commissioner Rajesh Patil appreciate work of KDMC.

15 महापालिकेच्या आयुक्तांसमोर केडीएमसीच्या घनकचरा प्रकल्पाचे सादरीकरण

गेल्या शनिवारी अप्पर मुख्य सचिव सुजाता सोनिक यांच्यासमोर कल्याण डोंबिवली महापालिका राबवित असलेल्या घनकचरा प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. यावेळी राज्यातील 15 महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते. हे सादरीकरण पाहून पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्यासह स्थायी समिती सभापती आणि सर्व पक्षाचे गटनेते यांनी कल्याण डोंबिवली महापालिका राबवित असलेले घनकचरा प्रकल्प पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांनी केडीएमसीला भेट देऊन घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली.

घनकचरा प्रकल्प बघून अधिकारी प्रभावित

आयुक्त राजेश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी काल (8 जुलै) कल्याण डोंबिवली महापालिकेस भेट दिली. महापालिका ओला-सुका कचरा वर्गीकरण करीत आहे. बड्या सोसायट्यांमध्ये कचरा प्रकल्प सुरु केले आहेत. पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी केडीएमसीने कचरा वर्गीकरणासाठी काय प्रयोग केले? महापालिकेचा कचरा प्लांट, बायोगॅस या प्रकल्पांची पाहणी केली. हे सगळे पाहून आयुक्त पाटील यांच्यासह पदाधिकारी प्रभावित झाले. याच प्रकारचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

केडीएमसीची शुन्य कचरा मोहिम

केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेने शून्य कचरा मोहिम मे 2020 मध्ये सुरु झाली. गेल्या दीड वर्षात त्याला बऱ्यापैकी यश आले आहे. यापूर्वी केवळ एकूण कचऱ्यापैकी पाच टन कचऱ्याचे वर्गीकरण केले जात होते. आता एकूण कचऱ्यापैकी 90 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे (Pimpri Chinchwad Municipal Commissioner Rajesh Patil appreciate work of KDMC).

हेही वाचा : आणि पंकजा मुंडेंचा कंठ दाटला, डोळे डबडबले, नाराजीवर उत्तर देता देता बाबांची आठवण