मुंबई-पुण्यात पालकमंत्री, महापौर, आयुक्त बैठका घेतात, केडीएमसीत पालकमंत्री कुठे? मनसे आमदारांचा खोचक टोला

| Updated on: Apr 19, 2021 | 8:46 PM

मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. केडीएमसीत प्रशासक म्हणून आयुक्त आहेत. महापौर नाही. मात्र, पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला (Raju Patil meet KDMC commissioner Vijay Suryawanshi)

मुंबई-पुण्यात पालकमंत्री, महापौर, आयुक्त बैठका घेतात, केडीएमसीत पालकमंत्री कुठे? मनसे आमदारांचा खोचक टोला
मनसे आमदार राजू पाटील
Follow us on

कल्याण (ठाणे) : मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. केडीएमसीत प्रशासक म्हणून आयुक्त आहेत. महापौर नाही. मात्र, पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला. राजू पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीची दखल घेत डोंबिवलीत दोन ठिकाणी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करुन त्वरीत काम सुरु करावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. इतकेच नाही तर लसीकरणासाठी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. राजू पाटील यांनी सोमवारी (19 एप्रिल) महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या (Raju Patil meet KDMC commissioner Vijay Suryawanshi).

राजू पाटलांकडून आयुक्तांना सूचना

कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार गेली आहे. मृत्यू वाढताहेत. बेड मिळत नाही. ऑक्सिजन मिळत नाही. व्हेंटिलेटर मिळत नाही. या गंभीर परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आमदार राजू पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत आणि त्यांचे सहकारी हरीष जोशी यांनी केडीएमसी आयुक्ताची आज सायंकाळी भेट घेतली. ही बिकट परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही सूचना राजू पाटील यांनी आयुक्तांना केल्या. मुख्यत: लसीकरणाच्या कामासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी दर्शविली. लसीकरण काही केंद्रांवर सुरु आहे. मात्र लसीचे डोस कमी प्राप्त होतात. तेव्हा आधी केंद्रे जास्त उभारा. डोस प्राप्त झाल्यावर लसीकरण थांबणार नाही, अशी सूचना त्यांनी दिली.

डोंबिवलीत स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी

काही दिवसापूर्वीच कल्याण डोंबिवलीत स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मृतकाच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ने प्रदर्शित केली होती. या बातमीची दखल घेत मनसे आमदार राजू पाटील यांनी आयुयाक्तांशी केलेल्या चर्चेत डोंबिवलीत दोन ठिकाणी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करुन काम लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी नगररचना कार्यालयात जाऊन जागेचा आढावाही घेतला.

राजू यांची पालकमंत्र्यांवर टीका

मुंबई आणि पुण्यात महापौर,  पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. केडीएमसीत प्रशासक म्हणून आयुक्त आहेत. महापौर नाही. मात्र पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे (Raju Patil meet KDMC commissioner Vijay Suryawanshi).

हेही वाचा : मृत्यूनंतरही भोग सरेना, टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्व कब्रस्थानचा दफनविधीला नकार