Thane Medal : ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांना राष्ट्रपती सुधार सेवा पदक जाहीर

| Updated on: Aug 14, 2022 | 5:19 PM

अहिरराव यांच्या एकूण 27 वर्षातील उल्लेखनीय कामगिरी करीता यंदाच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना उत्कृष्ट सेवेकरीता राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक जाहीर झाले आहे.

Thane Medal : ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांना राष्ट्रपती सुधार सेवा पदक जाहीर
हर्षद अहिरराव यांना राष्ट्रपती सुधार सेवा पदक जाहीर
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहा (Thane Central Jail)चे अधीक्षक हर्षद भिकनराव अहिरराव यांना कारागृहातील उत्कृष्ट सेवेकरीता राष्ट्रपती सुधार सेवा पदक (President Reform Service Medal) जाहीर झाले आहे. त्याबद्दल हर्षद अहिरराव (Harshad Ahirrao) अनेक मान्यवरांकडून अभिनदन करण्यात येत आहे. अहिरराव हे 1995 मध्ये कारागृह विभागात तुरुंगाधिकारी म्हणून रुजू झाले. आतापर्यंतच्या 27 वर्षाच्या कालावधीत त्यांनी येरवडा, नाशिक, नागपूर, मुंबई या अति संवदेशनशील मध्यवर्ती कारागृहांचे तुरुंगाधिकारी, उपअधीक्षक या पदावर सेवा बजावली आहे. ठाणे येथे 2019 पासून अहिरराव अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.

कैद्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न

ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम पाहताना त्यांनी कारागृहातील कैद्यांच्या सुधारणा आणि पुनर्वसन करण्याच्या हेतूने बंद्यांना विनातारण कर्ज, प्रौढ साक्षरता अभियान/उच्च शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कोविड कालावधीत कैद्यांच्या नातेवाईकांना सामाजिक संस्थेच्या सहाय्याने रेशन पुरवठा, गरीब व गरजू कैद्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर सामाजिक संस्थेच्या मदतीने मोफत कायदेविषयक सहाय्य मिळवून देण्याकरीता प्रयत्न केले. कारागृहातील कैद्यांकरीता योगा, मेडीटेशन, वैद्यकीय शिबीरे आयोजित केले. बंद्यांच्या आहारात सुधारणा होण्यासाठी ऑटोमॅटिक चपाती मेकिंग मशीन, बल्क प्रेशर कुकर, सोलर वॉटर हिटर, जिम, हॉट-पॉट इत्यादी अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात पुढाकार घेतला.

तीन वर्षात 3000 कैद्यांना मुलभूत शिक्षण दिले

‘विद्यादानम’ प्रकल्पाच्या धर्तीवर गेल्या तीन वर्षात त्यांनी 3000 कैद्यांना साक्षर करुन मुलभूत शिक्षण दिले. अशा प्रकारे सुधारणात्मक कार्यक्रम त्यांनी राबविले. बंदी प्रत्यार्पण मोहिमेअंतर्गत दोन वेळा मॉरिशिअस येथे ते गेले आहेत. अहिरराव यांच्या एकूण 27 वर्षातील उल्लेखनीय कामगिरी करीता यंदाच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना उत्कृष्ट सेवेकरीता राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक जाहीर झाले आहे. अहिरराव यांनी 2016 ते 2019 या काळात मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कारागृहातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली. अहिरराव यांना कारागृहातील उल्लेखनीय कामगिरीकरीता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, पुणे यांच्याकडू 2018 मध्ये सन्मान चिन्ह (DG Insignia) देऊन गौरव करण्यात आले होते. (Thane Central Jail Superintendent Harshad Ahirrao was awarded President Reform Service Medal)

हे सुद्धा वाचा