Karnataka Murder : समुपदेशन सत्रानंतर एकत्र राहण्यास तयार झाले, न्यायालयातून निघताना पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले, बेंगळुरुमधील धक्कादायक घटना

शिवकुमार आणि चैत्रा यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र दोघांचे पटत नसल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

Karnataka Murder : समुपदेशन सत्रानंतर एकत्र राहण्यास तयार झाले, न्यायालयातून निघताना पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले, बेंगळुरुमधील धक्कादायक घटना
बंगुळुरुमध्ये पतीकडून पत्नीची हत्या
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 4:39 PM

बंगळुरू : घटस्फोटा (Divorce)साठी अर्ज केल्यानंतर कौटुंबिक न्यायालयात समुपदेशना (Counselling)साठी आले असता पतीने न्यायालयातच पत्नीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. पत्नीवर हल्ला (Attack) केल्यानंतर आरोपी पतीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शिवकुमार असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे काही मिनिटांपूर्वीच समुपदेश सत्रात दोघांनी घटस्फोट न घेता सोबत राहण्याचे मान्य केले होते. जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. चैत्रा असे मयत पत्नीचे नाव आहे.

समुपदेशनानंतर पत्नी कोर्टातून बाहेर पडत असतानाच पतीने हल्ला केला

शिवकुमार आणि चैत्रा यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र दोघांचे पटत नसल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार कौटुंबिक न्यायालयात त्यांना समुपदेशन सत्रासाठी बोलावण्यात आले होते. तासाभराच्या समुपदेशनानंतर पत्नी कोर्टातून बाहेर पडत असतानाच शिवकुमारने तिच्यावर हल्ला केला. तो पत्नीच्या मागे वॉशरूममध्ये गेला आणि कुऱ्हाडीने तिचा गळा चिरला. यात जखमी चैत्राचे बरेच रक्त वाहून गेले. गुन्हा केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडले. चैत्राला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र घशात खोलवर जखमा झाल्याने आणि भरपूर रक्त वाहून गेल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी शिवकुमारवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे हत्यार न्यायालयाच्या आवारात आणण्यात कसा यशस्वी झाला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

ही घटना न्यायालयाच्या आवारात घडली. आरोपीला आम्ही आमच्या ताब्यात घेतले आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार आम्ही जप्त केले आहे. समुपदेशन सत्रानंतर काय झाले आणि त्याच्याकडे न्यायालयात शस्त्र कसे आले याचा तपास करू. ही पूर्वनियोजित हत्या होती का, याचाही तपास केला जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिराम शंकर यांनी सांगितले. (Husband kills wife with ax in family court in Karnataka)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.