मोठी बातमी! ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे तब्बल 70 रुग्ण, आरोग्य विभागाची चिंता वाढली

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे (एचवनएनवन) तब्बल 70 रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात 87 रुग्ण सापडले होते. मात्र यावर्षी केवळ जून महिन्यातच रुग्णांची संख्या वाढली आहे.

मोठी बातमी! ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे तब्बल 70 रुग्ण, आरोग्य विभागाची चिंता वाढली
ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे तब्बल 70 रुग्ण
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 5:00 PM

ठाण्यात स्वाईन फ्ल्यू (एचवनएनवन) तब्बल 70 रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात 87 रुग्ण सापडले होते. मात्र यावर्षी केवळ जून महिन्यातच रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आल्याची माहिती ठाणे पालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे 2009 मध्ये हा आजार समोर आला तेव्हा जगभरात एकच खळबळ उडाली होती. भारतातही अनेकांना या आजाराची लागण झाली होती. या आजारामुळे अनेक जण दगावल्याची माहिती समोर आली होती. पण या आजारावर योग्यप्रकारे उपचार घेतला तर माणूस बरादेखील होतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, जगभरात लाखो रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे. याशिवाय मास्करचा वापर करावा आणि खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा. आपले हात वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावे, असे अनेक उपाय या आजारावर आहेत.

स्वाईन फ्लू आजार नेमका कसा होतो?

स्वाईन फ्ल्यू हा एक संसर्गजन्य आजार असून H1N1 व्हायरसमुळे त्याची लागण होते. 2009 साली WHO ने हा रोग संसर्गजन्य असल्याचे जाहीर केले होते. हा आजार केवळ माणसांमुळे नव्हे तर प्राण्यांमुळे देखील होतो. ज्या व्यक्तीला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असेल तो शिंकला अथवा खोकला, तर त्यातून या आजाराचे विषाणू हवेत पसरतात. याचे विषाणू हवेत 8 तासांपर्यंत जिवंत राहू शकतात. या विषाणूंचा निरोगी अथवा स्वस्थ व्यक्तीचे डोळे, नाक, तोंड अथवा त्वचेशी संपर्क आला, तर विषाणूंचे संक्रमण होऊन त्या व्यक्तीलाही स्वाईन फ्ल्यूची लागण होते.

स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे काय?

ताप येणे, हुडहुडी भरणे वा थंड वाजणे, सर्दी होऊन नाक वाहते राहणे, खोकला, घशात खवखव किंवा दुखणे, अंगदुखी तसेच डोके दुखणे, पोटात दुखणे, मळमळ किंवा उलटी होणे, यासाखी लक्षणे स्वाईन फ्लूमध्ये दिसू शकतात. विशेष म्हणजे 65 वर्षांवरील नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला, तसेच मधुमेह , किडनीचे विकार असे आजार असणाऱ्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

Non Stop LIVE Update
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.