Thane News : अकराव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बेडरुमध्ये अडकली 2 वर्षांची चिमुरडी! पुढे जे घडलं, ते तर…

| Updated on: Jul 08, 2022 | 1:42 PM

घोडबंदर रोडवरील ओवळा इथं हा प्रकार घडला

Thane News : अकराव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बेडरुमध्ये अडकली 2 वर्षांची चिमुरडी! पुढे जे घडलं, ते तर...
थोडक्यात निभावलं...
Image Credit source: instagram
Follow us on

लहान मुलांचा काही नेम नाही. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असते. तसं केलं नाही, तर कधी काय होईल, याची कुणी कल्पनाही करु शकत नाही. असाच एक प्रकार ठाण्यात (Thane News) समोर आला आहे. ठाण्यामध्ये एक दोन वर्षांची चिमुरडी एका बेडरुमध्ये (Bedroom) अडकली. ठाण्यातील इमारतीच्या अकराव्या माळ्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा थरार घडला. यानंतर एकच गोंधळ उडाला होता. शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. बेडरुमध्ये गेल्यानंतर या घरातील बेडरुमचं दार बंद झालं. त्यानंतर बेडरुमचा दरवाजा उघडलाच जात नव्हता. या बेडरुमचं लॅश लॉकर (Door Latch) खराब झालं. त्यानंतर आता दरवाजा उघडायचा कसा असा प्रश्न घरातल्या लोकांना पडला होता.

नेमका कुठे घडला प्रकार?

घोडबंदर रोडवरील ओवळा इथं हा प्रकार घडला. ओवळा येथे असलेल्या अटलांटिक टॉवरच्या अकराव्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 1103 मधील बेडरुमध्ये ही घटना घडली. दरम्यान, ही मुलगी अडकल्यानंच कळल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाच्या जवानांना कळवण्यात आलं. त्यानंतर लगेचच घटनास्थळी येऊन या मुलीला जीवदान दिलंय. मात्र एकटीतच रुममध्ये अडकल्यामुळे या मुलीतीही घाबरगुंडी उडाली होती.

कसं वाचवलं?

बेडरुमच्या दरवाजाचा लॅश लॉक खराब झालं होतं. त्यामुळे अखेर डोअर ब्रेकरच्या मदतीने हे लॉक तोडण्यात आलं आणि त्यानंतर या मुलीला बाहेर काढण्यात आलं. मेहेर मिश्रा असं या दोन वर्षांच्या मुलीचं नाव आहे.

हे सुद्धा वाचा

प्रियंका मिश्रा यांच्या मालकीचा हा फ्लॅट होता. या फ्लॅटच्या बेडरुममध्ये मेहेर अडकल्यामुळे तिचे कुटुंबीयही धास्तावले होते. अखेर फायर ब्रिगेडच्या मदतीने या मुलीला वाचवण्यात यश आलंय. या घटनेमुळे मुलांना शक्यतो, एकटं एखाद्या खोलीमध्ये किंवा ग्रिल असलेल्या ठिकाणी, इलेक्ट्रीक साधनांच्या जवळ किंवा धोकादायक वाटणाऱ्या ठिकाणी एकटं सोडू नये, हे अधोरेखित झालंय.