Pradeep Purnekar Case : ‘आपण उत्तर द्यायचं’, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Pradeep Purnekar Case : पूर्णेकरांच्या हत्येमागे माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पप्या शिंदे यांच्यासह इतर संशयिताना ताब्यात घेतलं आहे.

Pradeep Purnekar Case : आपण उत्तर द्यायचं, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Uddhav Thackeray
| Updated on: Oct 01, 2026 | 10:14 AM

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : ठाण्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांना मंगळवारी रात्री निर्घृणपणे संपवण्यात आलं. गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. या राजकीय हत्येमुळे ठाणे जिल्हा हादरला आहे. ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पूर्णेकर कुटुंबाला ज्यांच्यावर हत्येचा संशय आहे, त्यांचं नावच एफआयआरमध्ये नव्हतं.म्हणून काल संजय राऊत आणि आदित्य ठाकरे ठाण्यामध्ये गेले होते. “पूर्णेकरांच्या हत्येचा संशय आहे, त्यांचं नावच एफआयआरमध्ये नव्हतं. त्यासाठी वांरवार इथे पूर्णेकर कुटुंब धरणं धरतंय. बाहेर मृतदेह आहे, एफआयआरमध्ये मुख्य संशयित आरोपीचं नाव नाही, म्हणजे तुम्ही कोणाला वाचवत आहात?” असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला.

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ठाण्यात दडपशाही सुरु आहे. त्यांची दडपशाही किती दिवस चालेल? आपण उत्तर द्यायचं. गद्दारी त्यांनी केली आहे. त्यांच्या विरोधात आपण कायम उभे राहणार आणि आपण प्रदीप पूर्णेकर कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभ राहायचं” असं उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत सांगितलं.

Loading...

कशी झाली हत्या

पूर्णेकरांच्या हत्येमागे माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पप्या शिंदे यांच्यासह इतर संशयिताना ताब्यात घेतलं आहे. कापुरबावडी पोलीस स्थानकातून ठाणे गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग करण्यात आलाय. आता या प्रकरणाचा तपास डीसीपी अमर जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ठाण्याच्या मनोरमा नगर परिसरातील रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मास्क घालून आलेल्या आरोपींनी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर चार राऊंड फायरिंग केली. त्यापैकी दोन गोळ्या पुर्णेकर यांना लागल्या

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us