माझ्यावर प्राणघातक हल्ला… नोकराला धमकावले, दिवा येथील बंगल्यावर दरोडा, तुकाराम मुंढे म्हणाले काय?

Tukaram Mundhe House Robbery Diva: ठाण्या जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या दिवा येथे भल्या पहाटे 7 ते 8 दरोडेखोरांनी दरोडा घातला. याप्रकरणी उद्योजक तुकाराम मुंढे यांनी आता खळबळजनक दावा केला आहे. यामुळे याप्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.

माझ्यावर प्राणघातक हल्ला... नोकराला धमकावले, दिवा येथील बंगल्यावर दरोडा, तुकाराम मुंढे म्हणाले काय?
माझ्यावर प्राणघातक हल्ला...दिवा येथील बंगल्यावर दरोडा, तुकाराम मुंढे म्हणाले काय?
| Updated on: Nov 18, 2026 | 11:28 AM

Tukaram Mundhe House Robbery Diva: ठाण्यातील दिवा परिसरातील आगासन गाव भागात एका बंगल्यावर भल्या पहाटे दरोडा पडला. 7 ते 8 दरोडेखोरांनी नोकरदारांना धमकावले. त्यांनी बंगल्यात प्रवेश केला. दरोड्यात चोरट्यांनी घरातील अडीच तोळे सोने आणि ८० हजार रुपये लंपास केले. उद्योजक तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यावर हा दरोडा घालण्यात आला. अगोदर नाम साधर्म्यामुळे हे प्रकरण गाजत असताना आता मुंढे यांनी आता खळबळजनक दावा केला आहे. यामुळे याप्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.

तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यावर दरोडा

Loading...

ठाणे जिल्ह्यातील दिवा शहराजवळील आगासन गावात पहाटेच्या वेळेस दरोडा घालण्यात आला. उद्योजक तुकाराम मुंढे यांच्या घरी दरोडा घालण्यात आला. चोरट्यांनी घरातील अडीच तोळे सोने आणि ८० हजार रुपये लंपास केले. सुरुवातीला IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नावाशी साधर्म्य असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. तर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नाही तर उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांचा बंगला असल्याचे समोर आले.

माझ्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

काल पहाटे बंगल्यात घुसून 7 ते 8 चोरांनी नोकरदार आणि तुकाराम मुंढे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्यासाठीच दरोडेखोर आल्याचा दावा मुंढे यांनी केला. ते दरवाजा तोडत होते. तेव्हा आपण गावातील लोकांना फोन लावला. गावकरी धावत आल्याने ते पळून गेले. आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याचाच त्यांचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप उद्योजक तुकाराम मुंढे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

नोकराला दरोडेखोरांनी धाक दाखवतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बंगल्यामध्ये तुकाराम मुंडे आणि नोकर रात्री झोपले होते इतर मुंडे परिवार देवदर्शनासाठी गेली असताना हल्ल्या पासून बचावले. दरोड्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. हा दरोडाच होता की मुंडे कुटुंबियांवर हल्ला करण्यासाठी आरोपी आले होते, असा प्रश्न आता विचारल्या जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us