तुमचे सल्लागार तुम्हाला बुडवायला बसलेत, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची टीका

| Updated on: Oct 06, 2022 | 9:48 PM

सख्खा भाऊ, चुलत भाऊ जवळचे सर्व गेले. उद्धव ठाकरें यांचे केवळ 'हम दो, हमारे दो!

तुमचे सल्लागार तुम्हाला बुडवायला बसलेत, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची टीका
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची टीका
Image Credit source: social media
Follow us on

संदेश शिर्के, Tv9 मराठी, प्रतिनिधी, ठाणे : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाच्या उल्लेख केला. दीड वर्षाच्या मुलाला आपल्या भाषणात खेचल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य संतापजनक आहे. उद्धवजी निरागसतेच्या पापाचे धनी होऊ नका, असे भावनिक पत्रच श्रीकांत शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या पत्रात शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकारण होत राहील, आरोप होत राहतील. मात्र यामध्ये घरातील लहान मुलांवर अशी टीका करू नका. अशी हात जोडून विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे.

उद्धव यांचे ‘हम दो, हमारे दो!

सख्खा भाऊ, चुलत भाऊ जवळचे सर्व गेले. उद्धव ठाकरें यांचे केवळ ‘हम दो, हमारे दो! आदित्यने पक्षासाठी काय केले ? तरीही आमदारकी मंत्रीपद दिले.आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कार्ट …

उद्धव साहेब राजकारण करा, पण निरागस बाळाला यात ओढू नका. लहान मुलांना बोलणे कुठल्या हिंदुत्वात बसते. तसेच तुमचे सल्लागार तुम्हाला बुडवायला बसले आहेत, असे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका करत नाराजी व्यक्त केली.

दोन गट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रथमच शिवसेनाच दसरा मेळावा देखील दोन ठिकाणी विभागण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा परंपरेने शिवाजी पार्क येथे संपन्न झाला.

दोन्ही दसरा मेळाव्यात तुफान गर्दी पाहायला मिळाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातू आणि खा. श्रीकांत शिंदे यांचे पुत्र रुद्राश शिंदे यांना उल्लेख आपल्या भाषणात केला.

यावेळी ठाकरेंनी शिंदेच्या कुटुंबावर टीका केली. “बाप मंत्री, कार्ट खासदार, आणि आता रुद्राश नगरसेवक… “अरे त्याला आधी शाळेत तर जाऊ द्या. अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांवर केली.

ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. अशोभनीय वक्तव्याचा निषेध केला. तसेच अत्यंत व्यथित मनानं उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.