शिवसेना पक्षफुटीवेळेची भाजपची ती चूक शिंदेंना महागात पडणार? कपील सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद काय?

शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे, त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

शिवसेना पक्षफुटीवेळेची भाजपची ती चूक शिंदेंना महागात पडणार? कपील सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद काय?
Shiv Sena hearing
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 05, 2026 | 4:42 PM

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला होता, त्यावेळी पक्षातील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली.  एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. शिवसेना दोन गटात विभागली गेली. एक म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट. दरम्यान त्यानंतर निवडणूक आयोगाकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील शिवसेना शिंदे गटाला देण्यात आलं. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून कोर्टात धाव घेण्यात आली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सुप्रील कोर्टात युक्तिवाद करत आहेत.

विधान परिषदेत क्रॉस वोटिंग झालं, तेव्हाच हे सर्व आमदार सुरतला गेले होते. सुरतहून हेच आमदार गुवाहाटीला गेले हा काही योगायोग नव्हता,  तेव्हाच ठाकरेंनी शिंदेंना विधिमंडळ नेता म्हणून दूर केलं होतं.  विधिमंडळात कुणाला कोणतं पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असतो,  बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनीच पक्षाची सूत्र स्वीकारली होती, असा युक्तिवाद यावेळी कोर्टात कपीन सिब्बल यांनी केला आहे.

दरम्यान शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर भाजपच्या लोकांनी त्यांचं स्वागत केल होतं,  ते का केल होत? ते सर्व जण भाज पक्षाचे नव्हते आणि ते त्यांच्या मित्रपक्षाचे देखील नव्हते?  एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या आमदारांसह राज्यपाल यांची भेट घेतली आणि सरकार बनवलं राज्यपाल यांनी त्यांना फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगितलं होतं, नार्वेकर यांच्याकडे अपात्रता बाबत अधिकार होते, असा युक्तिवादही यावेळी कपिल सिब्बल यांनी केला आहे. दरम्यान अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे पक्ष विरोधी कारवाई केल्याचं पत्र दिल होतं,  कोर्टाने त्यावेळी त्या आमदारांना उत्तर सादर करण्यासाठी वेळ वाढवून दिला होता, असंही  यावेळी सिब्बल यांनी म्हटलं आहे.

आधी  31 आमदार गुवाहाटीला गेले होते आणि मग ते 39 झाले,  सुरुवातीला त्यांना माहीत नव्हत की आपण हे करू शकू की नाही?  मात्र 31 चे 39 झाले. याचा अर्थ आपण सरकार स्थापन करत आहोत हे त्यांना समजलं होतं, अशा प्रकारचं वातावरण तयार करून सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पडला जाऊ शकतो आणि तो पाडल्याचं याठिकाणी दिसत आहे, असही यावेळी आपल्या युक्तिवादात कपील सिब्बल यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us