अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप जिंकल्याशिवाय राहणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांचे नाव न घेता भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जे लोक समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देऊ शकत नाही अशा निष्क्रिय लोकांना घरी पाठवलं पाहिजे.अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांचे नाव न घेता त्यांच्या टीका केली आहे. जे लोक समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देऊ शकत नाही अशा निष्क्रिय लोकांना घरी पाठवलं पाहिजे. अशा लोकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस खासदारावर टीका केली आहे.
अमरावतीत नवनीत राणा यांचा पराभव झाला होता
अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप जिंकल्याशिवाय राहणार नाही. 2029 मध्ये निष्क्रिय लोकांना घरी पाठवून नवनीत राणा यांना पुन्हा या लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. साल २०२४ मध्ये अमरावतीत नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांचा विजय झाला होता.