AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; पहिल्या उमेदवाराने अर्ज केला दाखल

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. शिवसेना शिंदे गट 6 जागांच्या मागणीवर ठाम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; पहिल्या उमेदवाराने अर्ज केला दाखल
eknath shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 29, 2026 | 8:53 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. अशा काही विधान परिषदेच्या जागा आहेत, जिथे दोन्ही पक्षांकडून भाजप आणि शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गट अजूनही 6 जागांवर ठाम आहे, तर भाजपने चार जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम असताना आता सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे.

महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम असताना आणि जागा वाटप निश्चित झालेलं नसताना देखील शिवसेना शिंदे गटाचे नेते रमेश बारसकर यांनी विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यात शिवसेना-भाजप राष्ट्रवादीची महायुती आहे. मात्र सोलापुरात शिवसेनेला विश्वासात घेतले जात नाही, निधी देखील दिला जात नाही. असा आरोपही यावेळी रमेश बारसकर यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले रमेश बारसकर ? 

निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव आणि जत्रा आहे. त्यात कार्यकर्त्याने सहभाग घेणे कर्तव्य आहे.  त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचाच असेल.  राज्यात शिवसेना-भाजप राष्ट्रवादीची महायुती आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला विश्वासात घेतले जात नाही, निधी देखील दिला जात नाही. कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधी नेमताना विश्वासात घेतले जात नाही. आम्हाला वेगळेपणाची वागणूक दिली जाते असा आरोप यावेळी बारसकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सर्व जागा लढवणार

दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील सर्व 17 जागांवर आपले उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला