देखणं शरीर आणि मजबूत बांधा, अकलूजच्या बाजारात 50 लाखांचा घोडा

रवी लवेकर, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : तुम्ही आवडीची गाडी घेण्यासाठी लाखो रुपये मोजले असतील, किंवा 10 लाख, 20 लाख आणि 30 लाखांची गाडी तुम्हाला आवडत असेल. पण घोड्याची किंमत 50 लाख रुपये आहे असं कधी ऐकलंय का? सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या घोडेबाजारात 50 लाख रुपयांचा घोडा विक्रीसाठी आला आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमधून आलेल्या रूद्र या […]

देखणं शरीर आणि मजबूत बांधा, अकलूजच्या बाजारात 50 लाखांचा घोडा
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:02 PM

रवी लवेकर, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : तुम्ही आवडीची गाडी घेण्यासाठी लाखो रुपये मोजले असतील, किंवा 10 लाख, 20 लाख आणि 30 लाखांची गाडी तुम्हाला आवडत असेल. पण घोड्याची किंमत 50 लाख रुपये आहे असं कधी ऐकलंय का? सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या घोडेबाजारात 50 लाख रुपयांचा घोडा विक्रीसाठी आला आहे.

उत्तर प्रदेशातील बरेलीमधून आलेल्या रूद्र या घोड्याची किंमत 50 लाख रूपये आहे. रूद्र सारखा दिसणारा एकही घोडा या बाजारात नाही. त्यामुळे हा 50 लाख रुपयांचा घोडा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

या घोड्याचे पाय, शेपटी, कान डोळयाच्या कडासुद्धा काळया आहेत. या घोड्याच्या अंगावर पांढरा केस नसल्यामुळे या घोड्याची किंमत 50 लाख रूपये सांगितली जाते.

हा घोडा मारवाड जातीचा तेलीया कुम्मेत प्रकारातील आहे. या प्रकारात क्वचितच असा घोडा जन्मतो. हा घोडा फक्त शान म्हणून शौकीन लोक पाळतात. याची सुंदरता हीच याची किमत असल्याचं मालक सांगतात.

या घोड्याची शरीरयष्टी आणि बांधा अगदी मजबूत आणि रेखीव असल्याने हा दिसायला रूबाबदार दिसतो.

हा घोडा फक्त 26 महिन्यांचा असून याला रोज सकाळी संध्याकाळी पाच लिटर दूध पिण्यासाठी देतात. तसेच एक किलो हरभराही याच्या खुराकात समाविष्ट आहे. या तरुण घोड्याने अकलूजच्या बाजारात येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलंय.

पाहा व्हिडीओ :


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें