नाशिकच्या महंताने घेतली न्यायालयाच्या निर्णया विरोधात भूमिका, नवा वाद उभा राहण्याची शक्यता…

| Updated on: Sep 29, 2022 | 9:03 PM

महंत अनिकेत शास्री यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला असून बोकड बळीच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

नाशिकच्या महंताने घेतली न्यायालयाच्या निर्णया विरोधात भूमिका, नवा वाद उभा राहण्याची शक्यता...
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

नाशिक : तब्बल पाच वर्षांनी नाशिकच्या सप्तशृंग गडावर (Saptashrungi Fort) दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी निर्णयाला परवानगी मिळाली आहे. उच्च न्यायालयात (High Court) याबाबत जनहित याचिका नाशिक (Nashik) धोडांबे येथील आदिवासी विकास संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी (ता. 29) झालेल्या सुनावणीत बोकड बळीला अटी शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. जुलै 2019 मध्ये बोकड बळी विधीला परवानगी मिळावी यासाठी प्रशासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेल्या याच निर्णयाच्या संदर्भात नाशिकमधील महंत अनिकेत शास्री यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी शास्राच्या आधारावर ही पशू बळी प्रथा चुकीची असल्याचा दाखला दिला आहे. याशिवाय महंत अनिकेत शास्री यांनी पशू बळी प्रथा बंद व्हावी यासाठी कायदा करावा अशी मागणी देखील केली आहे.

महंत अनिकेत शास्री यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला असून बोकड बळीच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

यावेळी न्यायायलायच्या निर्णय ऐकून आणि पाहून अतिशय मनाला वेदना झाल्या असून निषेध व्यक्त करत असल्याचे त्यांनी त्यात म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीची ओळख असून खान्देश वासियांचे श्रद्धास्थान आहे.

सप्तशृंग गडावर गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी गडाच्या पायरीवर बोकड बळी देण्याची प्रथा आहे. मात्र, पाच वर्षापासून यावर बंदी घालण्यात आली होती.

बोकड बळी देत असतांना सुरक्षा रक्षकाकडून अनवधानाने रायफलमधून गोळी सुटली होती, त्यातून निघालेली गोळी भिंतीला लागल्याने 12 जण छरे मुळे जखमी झाले होते.

त्यामुळे प्रशासनाने बोकड बळीच्या प्रथेला बंदी घातली होती, मात्र त्याविरोधात न्यायालयात धाव घेऊन पुन्हा या प्रथेला सुरुवात होणार आहे.
मात्र, याच निर्णयाला आता महंत अनिकेत शास्री यांनी विरोध दर्शविला असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.