सोलापुरात शाळेच्या इमारतीचा भाग कोसळला, विद्यार्थी बचावले

सोलापूर : नगरपालिका शाळेतील इमारतीचा वरचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी सोलापूरमधील मंगळवेढा येथे घडली. दोन मजली शाळेच्या इमारतीचा वरचा भाग कोसळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर उभे असताना ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत. शाळेच्या निष्काळजीपणावर सध्या पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी मंगळवेढा …

सोलापुरात शाळेच्या इमारतीचा भाग कोसळला, विद्यार्थी बचावले

सोलापूर : नगरपालिका शाळेतील इमारतीचा वरचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी सोलापूरमधील मंगळवेढा येथे घडली. दोन मजली शाळेच्या इमारतीचा वरचा भाग कोसळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर उभे असताना ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत. शाळेच्या निष्काळजीपणावर सध्या पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळी मंगळवेढा येथील नगरपालिका शाळेत ही घटना घडली. विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर उभे असताना ही इमारत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे शाळा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाच्या विरोधात पालकांमधूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नुकतेच जानेवारी महिन्यातही शाळेची भिंत कोसळल्याने अमरावती येथील एका विद्यार्थाचा मृत्यू झाला होता. यासोबतच पुण्यातील जिल्हापरिषदेच्या अनेक शाळांही धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी शाळेच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र यावर राज्याच्या शिक्षण विभागाकडूनही काना डोळा करण्यात येतो का, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *