ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पुण्यात केला राडा, हिंमत असेल तर सोडाच म्हणत कार्यकर्ते आक्रमक, व्हिडिओ

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्र्यांना बंदीचा फतवा आणि वादग्रस्त विधाने केल्यानं महाराष्ट्रात वातावरण चिघळलेल आहे. विविध ठिकाणी त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे.

ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पुण्यात केला राडा, हिंमत असेल तर सोडाच म्हणत कार्यकर्ते आक्रमक, व्हिडिओ
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Dec 06, 2022 | 5:21 PM

योगेश बोरसे आणि अभिजीत पोते, पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न अधिकच चिघळला आहे. कर्नाटक सरकारकडून मंत्र्यांनी कर्नाटक मध्ये येऊ नये, महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन अथवा माध्यमांशी बोलू नये असे फतवे काढल्याने वाटवरण चांगलेच तापले होते. त्यातच महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड कर्नाटक राज्यात सुरू झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. परिस्थिती अधिकच गंभीर होत असतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वारगेट बसस्थानकात राडा केला आहे. कर्नाटक येथील असलेल्या बसेसला काळे फासले जोरदार घोषणाबाजी केली आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यातच अनेक ठिकाणी काळे फासले आहे. अनेक यात्रेकरू देखील अडकले आहे. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी निदर्शने केल्याचे दिसून येत आहे.

पुणे तेथील स्वारगेट बसस्थानक येथे कर्नाटक सरकारच्या अनेक बसेस उभ्या होत्या, कर्नाटकमध्ये झालेल्या घटनेला उत्तर म्हणून महाराष्ट्रात पडसाद उमटायला लागले आहे.

पुण्यातील स्वारगेटमध्ये असेलल्या अनेक वाहनांना शिवसेना ठाकरे गटाकडून वाहनांना काळे फासण्यात आले, याशिवाय बसेस अडवून ठेवण्यात आल्या होत्या.

महाविकास आघाडीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात देखील उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत कर्नाटक सरकारला इशारा दिला होता.

त्यातच शरद पवार यांनी देखील मराठी भाषिकांवरील अन्याय येत्या 48 तासात थांबले नाहीत तर मलाही बेळगावला जावं लागेल, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिला होता.

कर्नाटकमधील बेळगाव येथील अनेक मराठी भाषिकांवर अन्याय केल्याची बाब समोर आली आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीलाही निवेदन देऊ दिले नाही.

एकूणच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्र्यांना बंदीचा फतवा आणि वादग्रस्त विधाने केल्यानं महाराष्ट्रात वातावरण चिघळलेल आहे. विविध ठिकाणी त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे.