Sawai Gandharva Bhimsen Festival| यंदा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव फेब्रुवारी रंगणार ; कोरोना नियमांचे होणार पालन

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी. या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल.

Sawai Gandharva Bhimsen Festival| यंदा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव फेब्रुवारी रंगणार ; कोरोना नियमांचे होणार पालन
Sawai Gandharva festival
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 4:27 PM

पुणे – अभिजात संगीतचा सोहळा असलेल्या 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे (दि 2 फेब्रुवारी ते 6फेब्रुवारी-2022) या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांना जगभरातील शास्त्रीय संगीताच्या मांदियाळीत रामावणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे करण्यात आले आहे. शहरातील मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव संपन्न होणार आहे. आधी कोरोना आणि नंतर ओमिक्रॉमच्या संकटामुळे यंदातरी सवाई महोत्सव होणार का? याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले होते. मात्र आता महोत्सवाच्या तारखा निश्चित झाल्याने पुणेकरांसह सर्व संगीत प्रेमींचे लक्ष लागले होते.

भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी. या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल. अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे.

कोरोना नियमावली काय सांगते?

काही द दिवसांपूर्वी ओमीक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 25 टक्के प्रेक्षकांनाच उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. मात्र इतक्या अल्प प्रेक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे संयोजन कसे करायचे असा प्रश्न आयोजकांना पडला होता. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रशासनाने किमान 50 टक्के प्रेक्षक वर्गाला परवानगी द्यावी, असे मत आयोजकांनी व्यक्त केले होते.

Neem Face Masks: ग्लोइंग स्किनसाठी घरगुती कडुलिंबाचा फेस पॅक

उशिराचे शहाणपण : 30 लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप, उर्वरीत रक्कम कधीपर्यंत होणार जमा?

Pune Crime | फ्रेशर्स पार्टीत राडा, दोघा ज्युनिअर्सना मारहाण, पुण्यात इंजिनिअरिंगच्या 12 विद्यार्थ्यांवर गुन्हा