ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण

मोठी बातमी समोर येत आहे, आज ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होती. मात्र या बैठकीवर ओबीसी मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याचं समोर आलं आहे. मंत्री छगन भुजबळ, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांनी बैठकीवर बहिष्कार घातला.

ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
chhagan bhujbal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 4:49 PM

मोठी बातमी समोर येत आहे, आज ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होती. मात्र या बैठकीवर ओबीसी मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याचं समोर आलं आहे. मंत्री छगन भुजबळ, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय राठोड यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. ओबीसी महामंडळाला निधीची तरदूत योग्य पद्धतीने केली जात नसल्याचा आरोप मंत्र्यांकडून करण्यात आला आहे. याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय राठोड यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला आहे.

मराठा आरक्षाणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामधील संघर्ष तीव्र  झाल्याचं पहायला मिळालं. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून ओबीसी समाजामधील वाढती आर्थिक दरी दूर करण्यासाठी तसेच इतर प्रश्नांसाठी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत.

या समितीमध्ये अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तर सदस्यांमध्ये मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, पंकजा मुंडे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अतुल सावे, दत्तात्रय भरणे यांचा समावेश आहे. दरम्यान आजच्या बैठकीवर मंत्री छगन भुजबळ, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय राठोड यांनी बहिष्कार घातला आहे.  ओबीसी महामंडळाला निधीची तरदूत योग्य पद्धतीने केली जात नसल्याचा आरोप या मंत्र्यांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान दुसरीकडे पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. पंधरा दिवसांत मागण्या मान्य नाही झाल्या तर मुंबईत जाऊ असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजाकडून देखील आंदोलनाची तयारी सुरू आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us