Maharashtra Corona, Omicron Update : सावधान! पुन्हा चिंता वाढली, आज पुन्हा 46 हजार पार, गाफिलपणा नडेल!

| Updated on: Jan 20, 2022 | 11:33 PM

गेल्या दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांचा (Maharashtra Corona Update) आकडा चाळीस हजारांच्या खाली गेला होता, मात्र आज राज्यात पुन्हा 46 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने पु्न्हा चिंता वाढली आहे.

Maharashtra Corona, Omicron Update : सावधान! पुन्हा चिंता वाढली, आज पुन्हा 46 हजार पार, गाफिलपणा नडेल!
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात वाढलेली रुग्णसंख्या घटत असल्याने मोठा दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा एकदा चिंता वाढू लागली आहे, गेल्या दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांचा (Maharashtra Corona Update) आकडा चाळीस हजारांच्या खाली गेला होता, मात्र आज राज्यात पुन्हा 46 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने पु्न्हा चिंता वाढली आहे. 46 हजार 197 नवे कोरोना रुग्ण वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या 24 तासात 37 कोरोना रुग्णांच्या मृत्युचीही नोंद झाली आहे. तर आज राज्यात ओमिक्रॉनचे (Omicron Update) 125 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहेत, त्यातच आकडेवारी घटल्याने थोडा दिलासा मिळाला होता, राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णयही झाला मात्र आत्ताची आकडेवारी शाळांचीही चिंता वाढवणारी आहे.

पुणे, नागपुरातही कोरोनाचा कहर सुरूच

दिवसभरात पुणे जिल्ह्यात 14 हजार 424 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात रुग्णांना 4 हजार 575 डिस्चार्ज देण्यात आलाय, तर नागपूर जिल्हयात गेल्या 24 तासांत 4 हजार 428 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदा 4 हजार 428 रुग्णसंख्येची नोंद झाल्याने नागपूरकरांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईला दिलासा कायम

मुंबईतील दरदिवशीची रुग्णसंख्या वीस हजारांच्या पुढे पोहोचल्याने चिंता वाढली होती, मात्र गेल्या काही दिवासांपासून मुंबईला सतत दिलासा मिळत असल्याने मुंबई महानगरपालिकेची चिंता कमी झाली आहे. मुंबईत आज दिवसभरात 5 हजार 708 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. येत्या सोमवारपासून मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना मुंबईतील रुग्णसंख्येतील घट कायम असणे ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.

Goa Election 2022 : उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडाळी, 3 बड्या नेत्यांनी थोपटले दंड! डोकेदुखी वाढणार?

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत! नेतेमंडळी म्हणतात कलाकार म्हणून योग्यच, तर पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे नथुराम गोडसे साकारणार; राजेश टोपे म्हणतात…