AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज फैसला का? खरी शिवसेना कोणाची? सर्वांच लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे

"स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोर्टाने निर्णय दिला तर धनुष्यबाण चिन्हांची ओळख लोकांच्या लक्षात येईल. पक्ष चिन्हांचे वाद आतापर्यंत झाले तेंव्हा ते गोठवलं होतं,आमच्या प्रकरणात मात्र ते दुसऱ्या बाजूला दिलं आहे. निर्णय घेताना निवडणूक आयोगाने कायदेविषयक खोडसाळपणा केला आहे, तो कोणाच्या दबावाने केलाय हे महत्वाचं आहे.कोर्टाचा वेळ वाचावा यासाठी सिब्बल यांनी ते एकत्र ऐका अस कोर्टाला सांगितल होतं" असं असिम सरोदे म्हणाले.

आज फैसला का? खरी शिवसेना कोणाची? सर्वांच लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे
Uddhav Thackeray-Eknath Shinde
| Updated on: Nov 12, 2025 | 11:34 AM
Share

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? यावर मागच्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या खटल्यात असं अनेकदा वाटलं की, आज निकाल येईल, उद्या येईल. पण सतत तारीख पे तारीख सुरु आहे. ज्या तारखेला सुनावणी असते, तेव्हा वाटतं की, आज निकाल येईल. पण पुन्हा पुढची तारीख दिली जाते. मागच्या महिन्यातही हेच झालं. आज म्हणजे 12 डिसेंबरला सुनावणी आहे. निदान आता तरी या खटल्याचा निकाल यावा, अशी ठाकरे गटातील नेत्यांची इच्छा आहे. “गेल्या सुनावणीत सुर्यकांत यांनी सलग सुनावणी घेऊ असं सांगितलं होतं. त्यामुळे आता तरी सलग सुनावणी होऊ द्या. 26 नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चिन्हाचं वाटप होणार आहे. त्यामुळे आज निर्णय झाला तर चांगलं होईल” दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई म्हणाले.

“पक्ष आणि चिन्हाचा निर्णय होणं अपेक्षित आहे. या प्रकरणात बराचसा युक्तिवाद झाला आहे. त्यामुळे याला अधिक वेळ लागणार नाही. पक्ष आणि चिन्हा सोबतच आमदार अपात्रता प्रकरण वेगळ नाहीच. त्याची लिंक आहे” असं अनिल देसाई म्हणाले. “यापूर्वी अनेक वेळा निराशा झाली आहे. पण आम्ही आशावादी आहोत. 3 वर्ष वाट पाहिली आहे. आणखी थोडा काळ वाट पाहू. निकाल आमच्या बाजूने लागेल हे अपेक्षित आहेच” असं विधान परिषदेचे आमदार अनिल परब म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या सहीनेचे एबी फॉर्म दिले गेले होते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत यांना फोन केला होता. त्यावर अनिल परब म्हणाले की, “ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आजारी असताना एकमेकांशी बोललं जातं. पण दोन्ही विषय वेगळे आहेत” “पक्ष चिन्हाच्या संदर्भात ही सुनावणी होऊ शकते. माझी सनद रद्द झाली म्हणून केसवर परिणाम होणार नाही. वकिलाच्या टीमचा मी भाग होतो. कोर्टात झालेल्या घटना मी आपल्यासमोर सांगू शकतो. फक्त कोर्टात बोलू शकत नाही. मात्र सर्व मला दिलेले काम मी करणार. महाराष्ट्रात धनुष्य आणि शिवसेना नावाचा फायदा एकनाथ शिंदेंना झाला. उद्धव ठाकरेंच्या सहीनेचे एबी फॉर्म दिले गेले होते. त्यावर पक्ष हा उद्वव ठाकरेंचा हे दिसून येतो. निवडणुक आयोगाने खोडसाळपणा केला आहे” असं असिस सरोदे म्हणाले.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...