Maharashtra Corona Update | राज्यात 32,329 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांचा आकडा 74,860 वर

राज्यात आज 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या आता 2 हजार 587 वर पोहोचली आहे. 

Maharashtra Corona Update | राज्यात 32,329 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांचा आकडा 74,860 वर
Follow us
| Updated on: Jun 04, 2020 | 12:48 AM

मुंबई : राज्यात आज (3जून) कोरोनाच्या रुग्णांमध्ये 2,560 नवीन (Total corona patient in Maharashtra) रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 996 रुग्ण बरे झाले आहेत. यासह महाराष्ट्रातील कोरोनाबधितांचा आकडा 74 हजार 860 वर पोहोचला आहे. यापैकी 32 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 39 हजार 935 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु (Total corona patient in Maharashtra) आहेत.

राज्यात आज 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या आता 2 हजार 587 वर पोहोचली आहे.

आज दिवसभरात कुठे किती जणांचा मृत्यू

मुंबई – 49

उल्हासनगर – 3

ठाणे – 2

नवी मुंबई – 3

वसई-विरार – 1

भिवंडी – 1

मीरा भाईंदर- 1

नाशिक- 8

धुळे – 4

जळगाव – 2

अहमदनगर – 1

नंदूरबार – 1

पुणे – 19

सोलापूर – 10

कोल्हापूर – 2

औरंगाबाद – 16

जालना – 1

लातूर- 1

अकोला – 2

इतर राज्ये – 3

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 71 पुरुष तर 51 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 122 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 69 रुग्ण आहेत तर 46 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 7 जण 40 वर्षांखालील आहेत. या 122 रुग्णांपैकी 88 जणांमध्ये (72 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2 हजार 587 झाली आहे.

राज्यात 5 लाख 71 हजार 915 लोक होम क्वारंटाईनमध्ये

आजपर्यंत राज्यात 4 लाख 97 हजार 276 नमुन्यांची कोरोना चाचणी झाली. त्यापैकी 74 हजार 860 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 46 शासकीय आणि 36 खासगी अशा एकूण 82 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. राज्यात 5 लाख 71 हजार 915 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 71 हजार 912 खाटा उपलब्ध आहेत. यात सध्या 33 हजार 674 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Total corona patient in Maharashtra) आहेत.

1 मे ते 1 जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत आहे. 1 जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा (4.74 टक्के ) देखील कमी झालेला आहे. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते.

राज्यातील कोरोनाबाधितांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Total corona patient in Maharashtra

संबंधित बातम्या :

जालन्यात कोरोना संशयिताचा अंत्यविधी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह, अंत्यविधीला उपस्थित 100 जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबादमध्ये अनलॉक 1 ची अंमलबजावणी, कोरोना संसर्गाची स्थिती काय?

कोरोनाची लस विकसित करण्यासाठी 30 माकडांवर प्रयोग, वनमंत्र्यांकडून माकडं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

वर्ध्यातील 21 वर्षीय कोरोनामुक्त तरुणीचा मेंदूज्वराने मृत्यू

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.