Pune omicron update| पुणे महापालिका प्रशासन अँक्शन मोडवर; गरज पडल्यास 48 तासात जम्बो रुग्णालय सुरु करणार

गरज पडल्यास येत्या 48 तासात जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली आहे. शहारातील सीईओपी च्या मैदानावर हे जम्बो रुग्णालय आहे.

Pune omicron update| पुणे महापालिका प्रशासन अँक्शन मोडवर; गरज पडल्यास 48 तासात जम्बो रुग्णालय सुरु करणार
pune jambo covid center

पुणे – पुण्यात ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासन अँक्शन मोडवर आली आहे. शहरातील जम्बो रुग्णालयाच्या स्वच्छतेचे काम सुरू करून ते पूर्ण करण्यात आली आहे. गरज पडल्यास येत्या 48 तासात जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली आहे. शहारातील सीईओपी च्या मैदानावर हे जम्बो रुग्णालय आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यसरकार व महापालिकेच्या मध्यस्थीने हे रुग्णालय सुरु करण्यात आले होते. जवळपास 800 रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता या रुग्णालयात आहे. रुग्णालयातील बेड , ऑक्सिजन बेड , व्हेंटिलेटरची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे.

घाबरू नका, काळजी घेऊयात : महापौर मुरलीधर मोहोळ

ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्यानंतर नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. त्यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यापासून, पुण्यात विमानप्रवास करून येणाऱ्या प्रत्येकाची महापालिकेच्या वतीने RT-PCR टेस्ट केली जात होती. पुणेकर नागरिकांनी, कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाण्याची गरज नाही. महापालिकेच्या वतीने सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे. परदेशातून आलेल्या आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, त्यांनी ती त्वरित घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

त्या इमारतीतील सर्वांची केली RT-PCR टेस्ट पुण्यात आढळलेला ओमिक्रॉनचा रुग्ण हा फिनलँड येथून प्रवास करून आलेल्या आहे. त्याला एका व्यक्तीला ओमायक्रोन व्हेरियंटची लागण असल्याचे समोर आले. मात्र संसर्ग झालेल्या व्यक्तीची प्रकृती उत्तम आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून त्या बाधित व्यक्तीच्या इमारतीमधील सर्वांची RT-PCR टेस्ट करण्यात आलेली आहे.

परिस्थती पाहूनच शाळेचा निर्णय घेतला जाईल मुंबई- पुण्यातील ओमिक्रॉनची स्थिती लक्षात घेऊनच शाळांचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ओमिक्रॉनबाबत आमचे बारीक लक्ष आहे. कोरोना टास्कफोर्स सोबत सातत्याने चर्चा सुरु असल्याची दिली माहिती.

Pimpri-Chinchwad omicron Update |ओमिक्रॉनच्या अटकावासाठी पिंपरी प्रशासन सज्ज ; जिजामाता रुग्णालयात ६ रुग्णांवर उपचार सुरु , रुग्णांची प्रकृती स्थिर

Soaked Chana Benefits : सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!

तीन बेपत्ता मित्र तलावात 30 फूट खोल मृतावस्थेत, शेवटच्या क्षणी काय घडलं? एकही साक्षीदार नाही जिवंत

Published On - 11:47 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI