मुंबईतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके आणि सीजेपीच्या अडचणीत मोठी वाढ, थेट वकिलाने..

अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन शिवाजी पार्कात झाले. या आंदोलनाकरिता मोठ्या संख्येने लोक समजले. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती. त्यातच आता अभिजीत दिपके यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसतंय.

मुंबईतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके आणि सीजेपीच्या अडचणीत मोठी वाढ, थेट वकिलाने..
Abhijeet Dipke
| Updated on: Oct 03, 2026 | 10:05 AM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने आंदोलन पुकारले. काल मुंबईतील शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. लोक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कात जमले. काही बॉलिवूड कलाकार देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेत आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या शिवाजी पार्कातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही सीजेपीने आंदोलन केले. या आंदोलनानंतर मोठा गोंधळ बघायला मिळाला. स्थानिक नागरिकांनी सीजेपीच्या आंदोलनाला जोरदार विरोध केला. त्यातच आता अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतंय.

कालचे मुंबईतील सीजेपीचे आंदोलन यशस्वी झाले खरे आपण आता समस्या वाढताना दिसत आहेत. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतरही सीजेपीने आंदोलन केले. सिद्धी देवलेकर नावाच्या वकिलने अभिजीत दिपके यांच्यासोबतच सीजेपीच्या नेत्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सिद्धी देवलेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, कॉकरोच जनता पार्टीला आंदोलन करण्याची परवानगी मिळाली नव्हती. त्यांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.

Loading...

मुंबई हायकोर्टाने 2013 मध्ये शिवाजी पार्कात आंदोलन होणार नाही, पोलिसांच्या परवानगीशिवाय हे स्पष्ट केले होते. परवानगी नसतानाही सीजेपीने मोठी गर्दी जमवली आणि आंदोलन केले, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास झाला. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण त्याकरिया योग्य जागा असणे आवश्यक आहे. त्यांनी सरळ दिल्लीतील जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करायला हवे होते. ज्ञानेश कुमार यांचा ते राजीनामा मागत आहेत मग मुंबईत आंदोलन करण्याचा अर्थ नक्की काय? त्यांनी फक्त लोकांना त्रास द्यायचा होता.

यादरम्यान त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आणि मुंबई पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचे म्हणत त्यांनी धन्यवाद दिले. आम्हाला सुरक्षा पाहिजे, या कारवाईमुळे सर्वसामान्यांना त्रास झाल्याचे यादरम्यान त्यांनी म्हटले. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, नाही तर कॉकरोच जनता पार्टी 10 ऑक्टोबरला दिल्लीत जाऊन आंदोलन करेल. अभिजीत दिपके शिवाजी पार्कातील आंदोलनादरम्यान जोरदार सरकारवर टीका करताना दिसली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us