टीव्ही 9 मराठीचे पत्रकार गजानन उमाटे यांना पु.ल.देशपाांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी पुरस्कार जाहीर

टीव्ही 9 मराठी’चे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे यांना महाराष्ट्र सरकारचा पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवैणी वृत्तकथा पुरस्कार जाहीर झाला आहे.

टीव्ही 9 मराठीचे पत्रकार गजानन उमाटे यांना पु.ल.देशपाांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी पुरस्कार जाहीर
Gajanan Umate
| Updated on: Jun 24, 2025 | 9:49 PM

राज्य सरकारच्या वतीने पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या पाच वषातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर झाला आहे. तसेच टीव्ही 9 मराठी’चे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे यांना महाराष्ट्र सरकारचा पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवैणी वृत्तकथा पुरस्कार जाहीर झाला आहे.

गजानन उमाटे यांनी कोरोना काळात केलेले काम लक्षात घेऊन त्यांचा पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवैणी वृत्तकथा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. गजानन उमाटे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’चे मुख्य संपादक उमेश कुमावत आणि इनपूट एडिटर मोहन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या वार्तांकनाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. 51 हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्य सरकारने या पुरस्कारांच्या निवडीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत पत्रकार पराग करंदीकर, संदीप भारांबे, रवींद्र बेडकींहाळ, जितेंद्र दोशी, स्वप्नसौरभ कुलक्षष्ठ, सईद अन्सारी, चंद्रकांत शिंदे, निलेश खरे, सम्राट फडणीस, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांचा समावेश होता.