परभणी जिल्ह्यात 2 दिवसाचा लॉकडाऊन

परभणी जिल्ह्यात 2 दिवसाचा लॉकडाऊन, आज रात्री 12 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत असणार लॉकडाऊन, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय.

परभणी जिल्ह्यात 2 दिवसाचा लॉकडाऊन
Breaking News
| Updated on: Mar 12, 2021 | 4:21 PM

परभणी जिल्ह्यात 2 दिवसाचा लॉकडाऊन, आज रात्री 12 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत असणार लॉकडाऊन, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे परभणीत स्थानिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन (Lokcdown) जाहीर करण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे 13 आणि 14 मार्च हे दोन दिवस परभणी जिल्हा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. आज मध्यरात्रीपासून सुरु झालेला लॉकडाऊन सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू असेल.

सविस्तर बातमी –  Maharashtra Lockdown: महाराष्ट्राची लॉकडाऊनमध्ये घोडदौड, नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन