AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहाच लॉरेन्स बिश्नोई, संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर दसरा मेळाव्यातून घणाघात

अमित शाहाच देशातील लॉरेन्स बिश्नोई आहेत, गुजरातचे अमित शाहा हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत हे लक्षात ठेवा, म्हणून आम्हाला रेजीम बदलायचे आहे, असा घणाघात संजय राऊतांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात केला आहे.

अमित शाहाच लॉरेन्स बिश्नोई, संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर दसरा मेळाव्यातून घणाघात
Sanjay raut on amit shahImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 20, 2026 | 8:07 PM
Share

शिवसेनेच्या शिवतीर्थावर अनेक पिढ्या घडल्या, पेटून उठल्या, त्यातलेच आम्हीही आहोत. शिवसेना दोन नाहीत, शटअप. शिवसेना एकच आहे. तिकडे अमित शाहांचा दांडिया आहे. विचार नाही, संघर्ष नाही, महाराष्ट्र, देश, स्वाभिमान नाही. इकडे प्रत्येकाच्या हातात बांबू आहे, गद्दारांसाठी म्हणतो आहे. अंडरवर्ल्डबरोबर आम्हीही वाढलो आहोत. लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही. अमित शाहाच लॉरेन्स बिश्नोई आहे. हे लक्षात ठेवा, म्हणून आम्हाला रेजीम चेंज करायचं आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ६० वर्ष होतायत. जे ६० वर्ष शिवसेनेसोबत जगले ते धन्य झाले असं मानतो. अनेक पिढ्या या शिवतीर्थाने घडवल्या. शिवसेना एकच ती म्हणजी आमची. आमची शिवसेना टिकाऊ, त्यांची शिवसेना विकाऊ. त्यांची शिवसेना अमित शाहांचा दांडिया खेळतेय.

लॉरेन्स बिश्नोई आहेत कुठे तो, अस्तित्वात नाही. अमित शाह हाच लॉरेन्स बिश्नोई आहेत. या देशाचा गृहमंत्री ज्याच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबादारी तोच अमित शाह माफिया आहे. गुजरातचा अमित शाह लॉरेन्स बिश्नोई म्हणूनच आम्हाला रेजीम चेंज करायचं आहे(सत्ता बदलायची आहे) शिवसेनेशी अनेकांनी पंगा घेतला अनेक गेले अनेक आले. स्टेजवरची गर्दी कधीही कमी झालेली नाही. सुरक्षा हवी असेल तर शिवसेना हे एकच शस्त्र. आज पुजेला इथे धनुष्यबाण नसेल. पण पुढच्या वेळी इथे आपल्याकडे धनुष्यबाण असेल. आम्ही शेवटपर्यंत धनुष्यबाण सोडणार नाही आम्ही धर्मरक्षक आहोत. पुढच्या मेळाव्यात धनुष्यबाण अपलाच असेल, असंही यावेळी राऊतांनी म्हटलं आहे.

जेनझींचं नाव घेतलं की मोदी, शाहांच्या बुडाला आग लागते. राहुल गांधींना पप्पू ठरवायला कोट्यवधी खर्च केले आणि नरेंद्र मोदींना ५६ इंचवरुन छोटा बंदर या जेनझींनी केलं. काही प्रश्न विचारला तर म्हणतात जय श्रीराम बोला. कायदा सुव्यवस्था बिघडली बोलतात जय श्रीराम बोलो. आता तुम्ही जय श्रीराम बोला तुम्ही जायची वेळ आली आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

राम मंदिरासाठी अभिजात मुहूर्त काढला होता १२ जानेवारी २०२४ मोदी तुमचा मुहूर्त चुकला, कायकाय चोरी झाली माहितीये. प्रभु रामाचे अलंकार, सीता माईची कर्ण फुलं, २७ मंगळसुत्र. श्रीरामाच्या पादुका चोरीला गेल्या, सीसीटीव्ही बंद करुन दानपेट्या चोरल्या. मोदी, शाह एप्रिलला जाणार आणि ग्यानुही जाणार अमित शाह राहतात तिथे ४ किमी परिसरात २ लाखाचं सैन्य. पंतप्रधान भूमीगत, अंडरग्राऊंड , कारण जनता रस्त्यावर आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!