विरोधकांची औकात माहित आहे, शिवनेरीवरुन उद्धव ठाकरेंचा हल्ला

विरोधकांची औकात माहित आहे, शिवनेरीवरुन उद्धव ठाकरेंचा हल्ला

सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, शिवनेरी (पुणे) : “विरोधकांची औकात मला माहित आहे. ताकाला जाऊन भांडे लपवणारा मी नाही. निवडणुका आहेत म्हणूनच अयोध्येचा मुद्दा घेतलाय”, असा थेट हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्या दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी इथं जाऊन आशीर्वाद घेतले. शिवनेरीवरील माती घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे शिवनेरीवर आले होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “अयोध्येत जाऊन आल्यावरच मी अधिक बोलेन. आता काही बोलणार नाही. मला काही जणांचा भांडाफोड करायचा आहे. केवळ राजकारणासाठी मी अयोध्येत जात नाही”.

शिवसेना, बाबरी आणि 1992 चा रक्तरंजित इतिहास

जे आमचं दैवत आहे, त्या जन्मभूमीची माती घेऊन जाणं हे खूप मोठं भाग्य आहे. ते राम मंदिर बनवण्यासाठी महत्वाचं आहे. शिवरायांचा आशीर्वाद घेऊन अयोध्येला जातोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

याशिवाय “सर्वांनी एकत्र येऊन राम मंदिर अंतिम टप्प्यात नेलं पाहिजे. शिवनेरीवरची ही केवळ माती नाही, शिवभक्तांच्या भावना आहेत. ही माती तिथं पोहोचल्यावर खऱ्या अर्थाने मंदिर बांधण्याला चालना मिळणार आहे”, असं उद्धव यांनी नमूद केलं.

अयोध्येत सभा घेणार नाही. साधू-संतांचा आशीर्वाद घ्यायला निघालो आहे. शरयू नदीच्या आरतीत सहभागी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

विरोधक म्हणतात राम मंदिर बांधण्यापूर्वी स्वत:च्या वडिलांचे म्हणजेच बाळासाहेबांचं स्मारक उभारावं,  या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांची औकात मला माहित आहे.

काय आहे मुंबई आणि अयोध्येचं नातं?

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या वादग्रस्त जागी हजारोंच्या संख्येने कारसेवक जमा झाले होते. भाजपतर्फे उत्तर प्रदेश सरकारला लिहून देण्यात आलं होतं, की वादग्रस्त जागेबाहेर फक्त आंदोलन करु… मात्र तिथे काहीतरी वेगळचं घडलं.

कारसेवकांनी बाबरी मशीद पाडल्याच्या बातम्या आल्या. या एका बातमीने काही तासात संपूर्ण देशात वातावरण तापलं. अयोध्येपासून सुमारे दीड हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत रस्त्यावर दगड पडू लागले होते.

त्याचवेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’वरुन थेट भूमिका घेत बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली. तोपर्यंत संपूर्ण मुंबई पेटली होती. 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर आणि 6 जानेवारी ते 20 जानेवारी या काळात मुंबईत जातीय दंगल पसरली.

संबंधित बातम्या 

शिवसेना, बाबरी आणि 1992 चा रक्तरंजित इतिहास

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI