डिमिलिटेशन विधेयकावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय? अखेरच्या क्षणी मोठा बॉम्ब टाकला, थेट
डिमिलिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

डिमिलिटेशन विधेयकावरून सत्ताधारी आणि विधेयकांवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी डिमिलिटेशन विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शरद उद्धव ठाकरेंनी या विधेयकाला विरोध करत भूमिका स्पष्ट केली आहे. या विधेयकाला संपूर्ण देशाला त्रासदायक ठरू शकतो, असा आरोप ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, मी देश आणि राज्याचा अधिक विचार करतो. विधेयकावर अनेकांनी मत मांडली आहेत. शिवसेनेने विरोध करण्याची भूमिका का घेतली, पहिली कारण हे डिमिलिटेशन करण्याची समितीवर मतचोरीचा आरोप झाला आहे. जनतेत सिद्ध झाला आहे. त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. ज्ञानेश कुमार यांनाच समितीवर ठेवण्यात आलं आहे. ही समिती किती जणांची असेल. तर तीन जणांची समिती असेल. यात ज्ञानेश कुमार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणार आहेत. त्यांना निवडण्याचा अधिकार हा नरेंद्र मोदी , अमित शहा यांनी केली आहे. ही त्यांची व्यक्ती असेल. या समितीत तिसरी व्यक्ती ही ज्ञानेश कुमार निवडतील. यात विरोधकांचाही समावेश नाही. भाजपकडे स्क्रिप्ट तयार आहे. या स्क्रिप्टवर सह्या ठोकून जनतेसमोर आणायची, हे एवढंच त्या समितीचं काम आहे’.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.