AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी मुख्यमंत्री, आजी मुख्यमंत्री, शॅडो मुख्यमंत्री आणि किंगमेकर; एक फोटो अनेक अर्थ!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल शनिवारी अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. (uddhav thackeray, raj thackeray and devendra fadnavis together at Balasaheb Thackeray’s birth anniversary event)

माजी मुख्यमंत्री, आजी मुख्यमंत्री, शॅडो मुख्यमंत्री आणि किंगमेकर; एक फोटो अनेक अर्थ!
| Updated on: Jan 24, 2021 | 11:31 AM
Share

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल शनिवारी अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. बऱ्याच वर्षानंतर एका महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्ताने सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याने मीडियानेही या नेत्यांचे भराभर फोटो काढले. त्यातील अनेक फोटोंचे अनेक अर्थ काढले जात आहेत. (uddhav thackeray, raj thackeray and devendra fadnavis together at Balasaheb Thackeray’s birth anniversary event)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावर प्रसंगाचा एक बोलका फोटो समोर आला आहे. या फोटोत विद्यमान मुख्यमंत्री, आजी मुख्यमंत्री, शॅडो मुख्यमंत्री आणि किंगमेकर आदी एकाच फ्रेममध्ये आले आहेत. पुतळ्याच्या समोरच असलेल्या स्टेजवर नेत्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या स्टेजवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसले होते. त्यांच्या बाजूला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते. मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या बाजूला राज्याच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका वठवण्याची ताकद असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे बसले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठी शिवसेनेच्या किंगमेकर मिसेस मुख्यमंत्री अर्थात रश्मी ठाकरे बसले होते.

या फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे हसताना दिसत आहेत. विशेष म्हणजे फोटोतील चारही व्यक्ती एकमेकांकडे बघताना दिसत नाहीत. स्टेजवर धीरगंभीर वातावरण असावं असं हा फोटो पाहून प्रथमदर्शनी वाटतं. मात्र, यातील महत्त्वाची बाब म्हणजे हे तिन्ही नेते बऱ्याच वर्षानंतर एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. मधल्या काळात विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर सत्ता समीकरणामुळे निर्माण झालेली राजकीय कटुता टाळून हे तिन्ही नेते एकमेकांना अत्यंत उत्साहात भेटले. एकमेकांना हसतमुखाने नमस्कार केला आणि एकत्रित फोटोही काढले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीच्या सभ्यतेचं हे बोलकं चित्रं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. (uddhav thackeray, raj thackeray and devendra fadnavis together at Balasaheb Thackeray’s birth anniversary event)

संबंधित बातम्या:

दोन फोटो जे मराठी माणसाला हवेहवेसे वाटणारे!

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेचा श्रीमंत सोहळा

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण; उद्धव ठाकरे म्हणतात…

(uddhav thackeray, raj thackeray and devendra fadnavis together at Balasaheb Thackeray’s birth anniversary event)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.