बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण; उद्धव ठाकरे म्हणतात…

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण कधीही विसरता येणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Balasaheb Thackeray's statue unveiled in Mumbai)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:58 PM, 23 Jan 2021
बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण; उद्धव ठाकरे म्हणतात...

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण कधीही विसरता येणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Balasaheb Thackeray’s statue unveiled in Mumbai)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील मुंबईतल्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. आणखी काय सांगणार. असे क्षण शब्दात व्यक्त करता येत नाहीत. शिवसैनिकांप्रमाणे माझ्याही आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हे देशाचे मोठे नेते होते. मार्गदर्शक होते. त्यांचे विचार आजही मार्गदर्शकच आहेत. त्यांचे सर्वांशीच ऋणानुबंध होते. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षाचे नेते राजकीय उंबरठे ओलांडून या कार्यक्रमाला आले, ही आनंदीची गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.

हा भावूक क्षण

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही हा भावूक क्षण असल्याचं सांगितलं. शिवसेनाप्रमुखांचं मुंबईवर अपार प्रेम होतं. त्याच मुंबईत आज त्यांचा पहिला पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. हा वेगळा आणि आनंदाचा क्षण आहे, असं आदित्य म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बराच वेळ हा पुतळा न्याहळत होते. कारण मुख्यमंत्री स्वत: कलावंत आहेत. त्यामुळे पुतळ्यातील बारकावे ते टिपत होते. याआधी पुतळा बनविण्याचं काम सुरू असतानाही त्यांनी अनेक सूचना केल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.

स्मारकाची बातमी येईलच

यावेळी आदित्य यांना शिवसेनाप्रमुखांचं स्मारक कधी होणार? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर स्मारकाची बातमी लवकच येईल, असं त्यांनी सांगितलं. (Balasaheb Thackeray’s statue unveiled in Mumbai)

उद्धव ठाकरे गाडी चालवत आले

दरम्यान, आज संध्याकाळी या पुतळ्याचा अनावरण सोहळा होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साडेपाचच्या सुमारास मातोश्री निवासस्थानातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही होते. कुलाबा येथील श्यामा प्रसााद मुखर्जी चौकात येण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत आले होते. मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी येताच मीडियाने त्यांना एकच गरडा घातला होता. (Balasaheb Thackeray’s statue unveiled in Mumbai)

 

संबंधित बातम्या:

Balasaheb Thackeray Statue unveiled | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेचा श्रीमंत सोहळा

जेव्हा राज यांनी अमित ठाकरेंना ‘कॉर्नर’ दाखवला!

(Balasaheb Thackeray’s statue unveiled in Mumbai)