बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेचा श्रीमंत सोहळा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे लोकापर्ण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्वच पक्षातील राजकीय दिग्गजांनी हजेरी लावली (Balasaheb Thcakeray Birth Anniversary).

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेचा श्रीमंत सोहळा
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 6:57 PM

मुंबई : वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन एकमेकांवर आरोपांचे फैरी झाडणारे नेते आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राला एक चांगली राजकीय परंपरा आहे. राजकारण आणि वैयक्तिक संबंध या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. हे दोन्ही टोक एकमेकांजवळ कधीच पोहोचत नाही, असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्येक पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही परंपरा अजूनही तशीच अबाधित आहे हे आजच्या कार्यक्रमातून सिद्ध होत आहे (Balasaheb Thcakeray Birth Anniversary).

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी सर्वच पक्षातील राजकीय दिग्गजांनी हजेरी लावली (Balasaheb Thcakeray Birth Anniversary).

कोण कोण उपस्थित?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र

नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नव्हते. त्यानंतर आज दुसऱ्यांदा उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर आले. (Raj Thackeray and Uddhav Thackeray)

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.

गेले काही वर्ष हा पुतळा लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातमी : मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...