Balasaheb Thackeray Statue unveiling Live | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, राज-उद्धव एकत्र

| Updated on: Apr 15, 2021 | 4:00 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

Balasaheb Thackeray Statue unveiling Live | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, राज-उद्धव एकत्र
Balasaheb Thackeray Statue

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray Statue Unveiling Ceremony)  त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.  बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण  (Balasaheb Thcakeray Birth Anniversary)   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 23 Jan 2021 06:39 PM (IST)

  मनसे प्रमुख राज ठाकरे कार्यक्रमस्थाळावरुन कृष्णकुंजकडे रवाना

  बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम संपवून राज ठाकरे कृष्णकुंजकडे रवाना झाले आहेत.

 • 23 Jan 2021 06:33 PM (IST)

  आजोबांचं मुंबईवर प्रेम होतं, सर्वांशी मैत्री जपल्यानं सर्वपक्षीय नेते उपस्थित: आदित्य ठाकरे

  बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बघताना आनंद होतो.  आजोबांचं मुंबईवर खूप प्रेम होतं. बाळासाहेब ठाकरेंनी सर्वासोबत मैत्री जपली, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

 • 23 Jan 2021 06:31 PM (IST)

  बाळासाहेब ठाकरे यांना सर्वपक्षीय नेते आणि शिवसैनिकांचं अभिवादन

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

 • 23 Jan 2021 06:22 PM (IST)

  शिवसेनाप्रमुखांचा पुतळा बनवणाऱ्या शशिकांत वडके यांचा सत्कार

 • 23 Jan 2021 06:19 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

 • 23 Jan 2021 06:18 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.

 • 23 Jan 2021 06:16 PM (IST)

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमस्थळी पोहोचले

  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.

 • 23 Jan 2021 06:10 PM (IST)

  Balasaheb Thackeray Statue unveiling Live | बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण थोड्याच वेळात

  बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं थोड्याचं वेळात अनावरण

 • 23 Jan 2021 06:10 PM (IST)

  Balasaheb Thackeray Statue unveiling Live | बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण थोड्याच वेळात

  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत.

 • 23 Jan 2021 06:05 PM (IST)

  बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण, दिग्गज नेते कार्यक्रमस्थळी दाखल

  बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि उदय सामंत कार्यक्रमस्थळी पोहोचले

  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मातोश्रीवरुन थोड्याच वेळात रवाना होणार आहे. 6 वाजता राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि उदय सामंत कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत.

  शरद पवार सिल्वर ओकवरुन कार्यक्रमस्थळाकडे रवाना

  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मातोश्रीवरुन थोड्याच वेळात रवाना होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. शरद पवार थोड्याच वेळात कार्यक्रम स्थळी पोहोचतील. 6 वाजता राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.

  Balasaheb Thackeray Statue unveiling Live | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमस्थळाकडे रवाना

  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मातोश्रीवरुन कुलाबा येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत . 6 वाजता राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.

  Balasaheb Thackeray Statue unveiling Live | राज ठाकरे, संजय राऊत कार्यक्रमस्थळी पोहोचले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत कुलाबा येथील कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ देखील याठिकाणी उपस्थित आहेत.

 • 23 Jan 2021 05:29 PM (IST)

  देशानं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं: नरेंद्र मोदी

  देशानं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं: नरेंद्र मोदी

 • 23 Jan 2021 04:55 PM (IST)

  पंतप्रधान मोदींची नेताजी सुभाष चंद्र बोस यांना श्रद्धांजली

  पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलला पोहोचले. इथे त्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित आहे.

 • 23 Jan 2021 04:19 PM (IST)

  राष्ट्रवादीची संवाद यात्रा, 28 तारखेपासून गडचिरोलीतून सुरुवात

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि जनता ही केंद्रबिंदू आहे. राष्ट्रवादी‌ अभिप्राय अभियान राबवून डिजीटल मोहीम सुरु केली होती. राष्ट्रवादीचा संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी ह‌ा कार्यक्रम. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढणार . गडचिरोलीतल्या अहेरीपासून २८ जानेवारीला दौऱायाला सुरुवात

  १७ दिवस पहिला टप्पा असणार. त्यात विदर्भ, खानदेशातले १४ जिल्ह्यात आम्ही जाणार‌ आहोत‌. १३ तारखेला या यात्रेचा समारोप होईल

  गोपीचंद पडाळकर यांच्या टीकेला मी गाभीर्यानं घेत नाही, ते सकाळी माझ्याबरोबरच्या बैठकीला नीट होते. मी मुंबईत येईपर्यंत वेगळे काय बोलले हे मला समजत नाही

 • 23 Jan 2021 01:12 PM (IST)

  महावितरणची आर्थिक परिस्थिती वाईट, स्वबळावर परिस्थिती सुधारायची आहे : नितीन राऊत

  महावितरणची आर्थिक परिस्थिती वाईट, वीज खंडित न करणाऱ्यासाठी मी डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती, डिसेंबर महिना कधीच संपलाय, ज्यांनी वीज वापरली त्यांनी बिल भरणे गरजेचं आहे, 64 टक्के थकीत वीज बिलाची वसुली झाली, महावितरणची स्थिती सुधारण्यासाठी कर्ज घेणार, राज्य सरकारकडून मदतीचा प्रश्नच नाही, स्वबळावर महावितरण परिस्थिती सुधारायची आहे

 • 23 Jan 2021 01:10 PM (IST)

  19 नगरसेवकांनंतर आता माजी आमदाराच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा

  पुण्यातील माजी आमदार घरवापसीच्या तयारीत, विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश, माजी आमदारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पक्षात येण्याची केली इच्छा व्यक्त, महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपला आणखी झटका बसण्याची शक्यता, अजित पवारांनी पक्षात घ्यायचं की नको ? स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपवला निर्णय, 19 नगरसेवकांनंतर आता माजी आमदाराच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा

 • 23 Jan 2021 01:08 PM (IST)

  भाजप आमदार प्रसाद लाड आणि राज ठाकरेंमधील भेट संपली

  भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले, भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट, येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसेत जवळीक वाढत असल्याची चर्चा, भेट संपल्यानंतर अमित ठाकरे प्रसाड लाड यांना सोडायला त्यांच्या गाडीपर्यंत आले

 • 23 Jan 2021 12:45 PM (IST)

  बहुजन विकास आघाडीचे युवा नेते पंकज देशमुखांचा पक्षप्रवेशाविनाच शिवसैनिक म्हणून घोषणा

  नालासोपारा : बहुजन विकास आघाडीचे युवा नेते पंकज देशमुखांचा पक्षप्रवेशाविनाच शिवसैनिक म्हणून घोषणा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज नालासोपाऱ्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जाऊन, बाळासाहेबांना वंदन करून, शिवसैनिक म्हणून कामाला सुरवात केली , तशी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, पंकज देशमुख हे आमदार क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक, बविआचे माजी सभापती निलेश देशमुख यांचे चुलत भाऊ, पंकज देशमुख यांच्याकडे युवा कार्यकर्त्यांचे मोठे संघटन असल्याने महापालिका निवडणुकीत बविआ विरोधात शिवसेनेला होणार मोठा फायदा

 • 23 Jan 2021 11:53 AM (IST)

  शरद पवार सीरम इनस्टिट्यूटमध्ये दाखल,आग लागलेल्या इमारतीची पाहणी करणार

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. ते गुरुवारी लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानाची पाहणी करु शकतात.

 • 23 Jan 2021 10:44 AM (IST)

  खडकवासलात तास दोन तास आलो तरी विक्रमी मतं मिळायची - शरद पवार

  एक काळ असा होता जेव्हा हा सर्व परिसर मला मतं देणारा होता, माझ्याकडे राज्य आणि राज्याबाहेरची जबाबदारी असायची, त्यामुळे प्रचाराला वेळ मिळायचा नाही, त्यामुळे खडकवासलात तास दोन तास आलो तरी विक्रमी मतं मिळायची, खडकवासलातील प्रत्येक गावात स्थानिक नेतृत्व असायचं , गावात एकोपा असायचा, हे गाव कुटुंबासारखं असायचं, आता गावात येतो तर कुठे आलो हे कळत नाही, शेती उद्धवस्त झाली, सोसायट्या आल्या, देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक येथे येऊन राहत आहेत

 • 23 Jan 2021 10:27 AM (IST)

  वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांनाच हिंदुहृदयसम्राट मानतो : संजय राऊत

  बाळासाहेब ठाकरे शतकातून एकदाच घडतात. हिंदुत्वाची जी लाट निर्माण झाली, त्याचे श्रेय बाळासाहेबांना जाते.

  बाळासाहेबांनी मराठी माणसाला लढण्याचं बळ आणि प्रेरणा दिली. त्यांच्यामुळे आज मराठी माणूस उभा आहे.

  आज देशात मराठी माणूस अनेक ठिकाणी आहे. त्याचे श्रेय बाळासाहेबांना आहे.

  बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं. यापुढेही मराठी माणूस अनेक शतकं त्यांचे स्मरण करत राहील.

  महाराष्ट्रात आज जो भाजप आहे. त्याचं श्रेय बाळासाहेबांनाच जाते.

  बाळासाहेबांनी भाजपसोबत युती केली. त्यामुळे भाजप खेड्यापाड्यात पोहोचला.

  स्थानिक पक्षांचं जे राजकारण सुरु आहे, त्याच्या उगमाला फक्त बाळासाहेबांना जाते.

  वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांनाच मी हिंदुहृदयसम्राट मानतो .

  बाळासाहेबांनी एकसंध महाराष्ट्र दिला.

  आज बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. या कार्यक्रमात सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील.

  मला बाळासाहेबांची रोज आठवण येते. मी त्यांच्यासोबत 30 वर्षे केलं.

  लेखणी आणि वाणी ही त्यांची दोन शस्त्र होती. सामाना कार्यालयाची पायरी चढताना मला त्यांची रोज आठवण येते.

  भाजपला जे आरोप करायचे आहेत, ते करावेत. बाळासाहेब ठाकरेंना कोणीही विसरु शकत नाही.

  बाळासाहेबांचे प्रोग्रेसिव्ह हिंदुत्व आहे.

 • 23 Jan 2021 10:09 AM (IST)

  पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं अनावरण

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 45 मीटर लांबीच्या राष्ट्रध्वजाचं अनावरण केलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. स्थानिक नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकारातून येथे एक पुष्पप्रदर्शनाचेही शरद पवार यांनी केलं. काही क्षणात शरद पवार जनतेला संबोधित करणार आहे.

 • 23 Jan 2021 10:09 AM (IST)

  पीएमसी बँक घोटाळा प्रकरण, ईडीची मोठी कारवाई, मनी लॉडरिंग प्रकरणात दोन जणांना अटक

  पीएमसी बँक घोटाळा प्रकरण, ईडीची मोठी कारवाई, मनी लॉडरिंग प्रकरणात दोन जणांना अटक, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्याला अटक, मेहुल ठाकूर आणि मदन गोपाल चतुर्वेदी यांना अटक, ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल पाच ठिकाणी धाडी टाकल्या होत्या, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी संबंधित विवा ग्रूपवर धाडी टाकल्या होत्या, या कारवाई नंतर ईडी अधिकाऱ्यांनी काल संध्याकाळी सहा वाजता या धाडीशी सम्बधीत मेहुल ठाकूर आणि मदन गोपाळ चतुर्वेदी या दोघांना ताब्यात घेऊन ईडी कार्यलयात आणलं होतं, त्यांची ईडी कार्यलयात सुमारे चार ते पाच तास चौकशी, त्यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली, मेहुल ठाकूर हा विवा ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे तर मदन गोपाळ चतुर्वेदी हा डायरेक्टर, या दोघांना आज सकाळी कोर्टात हजर केलं जाणार

 • 23 Jan 2021 09:10 AM (IST)

  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राज्यव्यापी दौरा, पक्षसंघटन आणि पक्ष मजबुतीसाठी दौरा

  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राज्यव्यापी दौरा, पक्षसंघटन आणि पक्ष मजबुतीसाठी काढणार दौरा, गडचिरोलीतल्या अहेरीपासून 28 तारखेला दौऱ्याला सुरुवात, 13 तारखेला नंदूरबारमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप, त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असा दौरा असणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा

 • 23 Jan 2021 09:08 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यात 29 जानेवारी रोजी सरपंच आरक्षण सोडत

  औरंगाबाद जिल्ह्यात 29 जानेवारी रोजी सरपंच आरक्षण सोडत, तालुका स्तरावर काढले सरपंच आरक्षण सोडत, जिल्ह्यातील 617 ग्रामपंचायतींना आरक्षण सोडतीची प्रतिक्षा, 29 जानेवारी पासून पून्हा सुरू होणार औरंगाबाद जिल्ह्यात राजकीय धुरळा, सध्या अनेक ग्रामपंचायत सदस्य सहलीवर झाले आहेत रवाना

 • 23 Jan 2021 09:07 AM (IST)

  सिन्नर तालुक्यातील वावी गावात धाडसी चोरी, बिअर बार फोडून दोन लाख तीस हजारांचा ऐवज लंपास

  नाशिक - सिन्नर तालुक्यातील वावी गावात धाडसी चोरी, बिअर बार फोडून दोन लाख तीस हजारांचा ऐवज लंपास, दारुच्या बाटल्या असलेल्या 30 खोक्यांवर डल्ला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

 • 23 Jan 2021 09:03 AM (IST)

  सोलापूरचे भाजप नगरसेवक सुनिल कामाठीसह 5 जणांना तडीपार

  सोलापूरचे भाजप नगरसेवक सुनिल कामाठीसह 5 जणांना तडीपार, सोलापूर जिल्हा, इंदापूर आणि उस्मानाबाद मधून 2 वर्षांसाठी तडीपार, कामठीसह इतर पाच जण अवैध धंद्याची होते संबंधित, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची कारवाई

 • 23 Jan 2021 08:45 AM (IST)

  पैठण तालुक्यातील ग्रामसेवक आत्महत्या प्रकरण, गटविकास अधिकाऱ्यांसह चार जणांना केले निलंबित

  औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ग्रामसेवक आत्महत्या प्रकरण, गटविकास अधिकाऱ्यांसह चार जणांना केले निलंबित, तीन ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे निघाले आदेश, औरंगाबाद जिल्हा परिषद सीईओ मंगेश गोंदवले यांनी काढले आदेश, गटविकास अधिकाऱ्यांसह तीन ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल

 • 23 Jan 2021 07:59 AM (IST)

  नागपूर महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये घोटाळ्याचा आरोप

  नागपूर महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये घोटाळ्याचा आरोप, घोटाळ्यात मनपाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्यावरंही भाजपचे आरोप, मनपाचे विधी समिति सभापती धर्मपाल मेश्राम यांचा गंभीर आरोप, महेश धामेचा यांना विलंबीत करण्याची धर्मपाल मेश्राम यांची मागणी, घोटाळ्याची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी, मनपातील किशोर सुरक्षा एजंसी आणि सुपर सेक्युरिटीवर आरोप

 • 23 Jan 2021 07:50 AM (IST)

  हत्येच्या घटनांनी पुन्हा हादरलं गृहमंत्र्यांचं नागपूर शहर, 36 तासात दोन खून

  हत्येच्या घटनांनी पुन्हा हादरलं गृहमंत्र्यांचं नागपूर शहर, नागपुरात 36 तासात दोन खून, तिघांच्या हत्येचा प्रयत्न, पाचपावली, कोतवाली, पारडी, कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील घटना,  पाचपावली हद्दीत अशोक मेश्राम या व्यक्तीची पुतण्याकडून हत्या

 • 23 Jan 2021 07:49 AM (IST)

  2017 मध्ये किटकनाशक विषबाधेमुळे 50 शेतकरी मृत्यू प्रकरण, विदर्भातील शेतकरी किटकनाशक कंपनीविरोधात स्वित्झर्लंड कोर्टात

  2017 मध्ये किटकनाशक विषबाधेमुळे 50 शेतकरी मृत्यू प्रकरण, विदर्भातील शेतकरी किटकनाशक कंपनीविरोधात स्वित्झर्लंड कोर्टात,  स्वित्झर्लंड बर्न कोर्टात भरपाईसाठी केला दावा, स्वित्झर्लंड बर्न कोर्टात कारवाई सुरु, सिंजेन्टा कंपनीच्या पोलो कंपनीविरोधात खटला

 • 23 Jan 2021 07:43 AM (IST)

  कराडमधील पाल खंडोबाची यात्रा रद्द, मंदिराच्या दहा किलोमीटर परिसरात प्रवेश बंदी

  कराड : पाल खंडोबाची यात्रा रद्द, मंदिराच्या दहा किलोमीटर परिसरात प्रवेश बंदी, ऑनलाईन दर्शन घेण्याचे पोलिसांकडून आवाहन, 25 जानेवारी रोजी आहे पाल खंडोबा यात्रेचा मुख्य दिवस, 30 जानेवारीपर्यंत मंदिर असणार बंद

 • 23 Jan 2021 07:42 AM (IST)

  चाचणीच्या टप्प्यात असलेल्या कोव्हॅक्सिन लसीला कमी प्रतिसाद

  चाचणीच्या टप्प्यात असलेल्या कोव्हॅक्सिन लसीला कमी प्रतिसाद, नागपूरच्या मेडिकलमध्ये 543 पैकी 214 जणांनी घेतली भारत बायोटेकची लस, कोव्हिशिल्ड लसीच्या तुलनेत कोव्हॅक्सिनला कमी प्रतिसाद, कोव्हॅक्सिनची ट्रायल सुरु असल्याने काही डॅाक्टरांचा नकार

 • 23 Jan 2021 06:47 AM (IST)

  रविवारी मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक

  रविवारी 24 जानेवारीला मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते  दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक असेल

 • 23 Jan 2021 06:41 AM (IST)

  धुळ्यात स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला आग, लाखोंचे साहित्य जळून खाक

  धुळे - धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील एका स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिराच्या सुमारास घडली, या आगीत लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे, यावेळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती, आगीचं करण अद्याप स्पष्ट झाले नसून आग साध्य आटोक्यात आहे, घटनेची माहिती मनपाच्या अग्निशामक विभागाला कळविण्यात आली होती, मात्र, अग्निशामक विभागाचे बंब नेहमी प्रमाणे उशिरा आल्याने दुकान मालकाचे लाखोच्या स्पेअर पार्ट्सच्या साहित्याचे नुकसान झाले आहे
 • 23 Jan 2021 06:39 AM (IST)

  अयोध्या श्रीराम मंदिर निधी संकलन शहापुरात सुरु, विवेक नार्वेकर यांन 51 हजार रुपये दिले

  श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम प्रभूंचे भव्य मंदिर निर्माण होत असून त्यासाठी निधी संकलन सुरू झाले आहे,     शहापूर शहरातही श्रीराम मंदिर निधी संकलन सुरू झाले असून भाजपचे शहापूर शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर व नगरसेविका वैदेही नार्वेकर या दाम्पत्याने श्रीराम मंदिरासाठी सुमारे ५१ हजार रुपये देणगी दिली, श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन समितीने विवेक नार्वेकर यांच्या घरी येऊन निधी संकलन केले.

Published On - Jan 24,2021 6:52 AM

Follow us
ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण, 'या' महिला नेत्यांची नावं घेत पक्षाला ठोकल
ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण, 'या' महिला नेत्यांची नावं घेत पक्षाला ठोकल.
झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली खंत म्हणाले, पक्षाला आमची किंमत नाही...
झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली खंत म्हणाले, पक्षाला आमची किंमत नाही....
मंत्र्यांना खाली उतरवले, चिमुकल्यांना घडवली शिंदेंनी हेलिकॉप्टरची सफर
मंत्र्यांना खाली उतरवले, चिमुकल्यांना घडवली शिंदेंनी हेलिकॉप्टरची सफर.
फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, आंदोलनाचा खर्चही केला; कुणाचा घणाघात?
फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, आंदोलनाचा खर्चही केला; कुणाचा घणाघात?.
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल.
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव.
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?.
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?.
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा.
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू.