दोन फोटो जे मराठी माणसाला हवेहवेसे वाटणारे!

शिवसेना आणि मनसे एकत्र यावेत ही मराठी माणसाची मनापासूनची इच्छा आहे. (uddhav thackeray and raj thackeray share stage)

दोन फोटो जे मराठी माणसाला हवेहवेसे वाटणारे!
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 10:52 AM

मुंबई: शिवसेना आणि मनसे एकत्र यावेत ही मराठी माणसाची मनापासूनची इच्छा आहे. नजीकच्या काळात हे दोन पक्ष एकत्र येतील अशी प्रत्येक मराठी माणसाला आशा आहे. पण असं असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अधूनमधून एकाच मंचावर पाहून मराठी माणूस सुखावून जातो. काल शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी हे दोन्ही नेते एकत्र आले आणि मराठी माणसाला सुखद दिलासा मिळाला. (uddhav thackeray and raj thackeray share stage)

कुलाब्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात काल शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांना पाचारण करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसही या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच सर्वांचे आकर्षण ठरले. या सोहळ्याला राज यांच्याबरोबर अमित ठाकरेही उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे हे कुटुंबासह आले होते. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी ठाकरे कुटुंब एकाच मंचावर एकत्र आलं होतं. दोन्ही भाऊ बऱ्याच वर्षानंतर एकाच मंचावर एकत्र आल्याने शिवसैनिक आणि मनसेसैनिकांनीही मोठी गर्दी केली होती. मीडियाने यावेळी प्रचंड गर्दी केली होती.

आणि क्लिकवर क्लिकचा पाऊस

उद्धव ठाकरे आणि राज एकत्र आल्यानंतर मीडियाचं सर्व लक्ष दोन्ही नेते एका फ्रेममध्ये कसे येतात याकडे लागले होते. दोन्ही नेत्यांना एका फ्रेममध्ये टिपण्यासाठी मीडियाची धडपड सुरू होती अन् तो क्षण येताच अक्षरश: क्लिकचा पाऊस पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुतळ्याच्या समोरच असलेल्या स्टेजवर आले. या ठिकाणी त्यांनी सर्वांना हसतमुखाने नमस्कार केला. त्यानंतर राज ठाकरे यांच्या बाजूला असलेल्या खुर्चीत जाऊन बसले. उद्धव आणि राज एका फ्रेममध्ये येताच मीडियानेही एकापाठोपाठ एक फोटो घेण्यास सुरुवात केली. स्टेजवर बसल्यानंतर उद्धव यांनी राज यांची विचारपूस केली. राज यांच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं आहे. त्याबाबतही त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर दोघांमध्ये हास्यविनोदही झाले. राज आणि उद्धव यांच्या एका फोटोत राज यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेलं दिसत आहे.

जनतेला अभिवादन

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी पुतळ्याच्या समोर उभं राहून फोटो काढले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बाजूबाजूलाच उभे होते. फोटो काढून झाल्यानंतर दोन्ही भावांनी हात जोडून उपस्थितांचे आभार मानले. दोघांनीही हात जोडलेला हा फोटो खूप काही सांगून जात आहे. कोणत्या प्रसंगी काय केलं पाहिजे, याबाबतची दोघाही नेत्यांची ट्यूनिंग अजूनही उत्तम असल्यांच त्यातून दिसून आलं. बऱ्याच दिवसानंतर हे दोन नेते एका स्टेजवर, एका फ्रेममध्ये दिसले…. आता महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोघेही नेते एकत्र येणार काय? असा प्रश्न शिवसैनिक आणि मनसे सैनिकांना पडल्यावाचून राहिला नाही. (uddhav thackeray and raj thackeray share stage)

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे हा दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखा भिकारी नाही; अब्दुल सत्तारांचा भाजपवर घणाघात

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांची उपस्थिती, पण अजित पवार कुठे होते?

उद्धव ठाकरेंची वाट बघता बघता राज ठाकरेंना कोण कोण भेटलं?

(uddhav thackeray and raj thackeray share stage)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.