उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा बदला, या मर्द मराठ्यानं घेतला, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं

| Updated on: Nov 04, 2022 | 9:46 PM

मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्राचा सत्यानाश त्यांनी केला, अशी जहरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा बदला, या मर्द मराठ्यानं घेतला, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भिवंडीत सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आठ वर्षांच्या विकासकामांना ब्रेक लावण्याचं काम गेल्या अडीच वर्षात झालं. जनकल्याणाच्या योजना उद्धव ठाकरे सरकारनं थांबविल्या होत्या. भिवंडीत होणारी विकासकामं उद्धव ठाकरे सरकारनं थांबविली होती. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बेईमानीचा बदला एकनाथ शिंदे यांच्या रुपानं मर्द मराठ्यांनी घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केली. त्यामुळं मंत्रीपदावर लाथ मारून एकनाथ शिंदे बाहेर पडले.

शरद पवार यांच्या ट्रपमध्ये उद्धव ठाकरे गेले होते. मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्राचा सत्तानाश त्यांनी केला, अशी जहरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

18 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेसबूक लाईव्ह करत होते. 18 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात आले नव्हते. मी वीस वर्षांपासून आमदार आहे. पण, असं मी कधीचं बघीतलं नाही.

परंतु, आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे 18 तास काम करत आहेत. आपली सरकार, आपली सरकार आहे. आपली सरकार आपली काम करणारचं.

ठाणेदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना चुकीची कामं करायला सांगणार नाही. पण, भाजप आता कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही. नियमानुसार काम झाली पाहिजेत. आम्ही सर्व जण कार्यकर्त्यांची कामं इमानदारीनं करण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिलं.