आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही शेण खाताय?, उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांची माफी का मागितली ?

मी संभाजीराजे यांच्याबद्दल चुकलो असेल तर जाहीर माफी मागतो, असं म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली. महायुतीच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं.

आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही शेण खाताय?, उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांची माफी का मागितली ?
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 8:52 AM

मी संभाजीराजे यांच्याबद्दल चुकलो असेल तर जाहीर माफी मागतो, असं म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली. महायुतीच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र शिवसेना व संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला होता. मात्र त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला होता. याच गोष्टीचा संदर्भ देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली. पण आम्हीं शेण खाल्ल म्हणुन तुम्ही शेण खाताय? तुम्ही आता काय करतायं? असा खडा सवालही त्यांनी विचारला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथल्ला यांच्या उपस्थितीमध्ये भव्य जाहीर सभा पार पडली. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी मागील घटनेचा संदर्भ देत वक्तव्य केलं. ‘ संभाजीराजे आणि मी काय निर्णय घेतला होता आम्हाला माहिती आहे. आमची मैत्री कायम आहे. तुम्ही तेंव्हा माझा सांजय पाडलात पण तो दगाफटका संभाजीराजे यांच्याबद्दल झाला असता तर ? मी संभाजीराजे यांच्याबद्दल चुकलो असेल तर जाहीर माफी मागतो. मात्र तुम्ही आता काय करतायं? आम्हीं शेण खाल्ल म्हणुन तुम्ही शेण खाताय? ‘ असा सवाल त्यांनी कोल्हापूरकरांना विचारला.

भाजपावर टीकास्त्र

या सभेत त्यांनी महायुती आणि भाजपावर कडाडून टीका केली.

हा महाराष्ट्र शिवाजी महाराज, शाहू, फुले आंवेडकरांचा आहे कि शाह, मोदी आणि अंबानीचा आहे ? आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे ,संयुक्त महाराष्टाची यशोगाथा सांगणारा हा दिवस आहे . हुतात्म्याच्या हातात जी मशाल आहे तीच मशाल घेऊन आपण पुढे जात आहोत , मी मनामध्ये एक शपथ घेतली रक्त सांडून मिळवलेली मी मुंबई महाराष्ट्रद्रोही यांच्या हातात जाऊन देणार नाही. त्यांचा सुफडा साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

आता दोन सुरतमधील दोघे माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत, भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी संपवायचे आहे असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आमच्या छत्रपतींची तुलना मोदी तुमच्याशी होऊ शकतच नाही, जो महाराष्ट्राच्या मुळावरती आलेला आहे त्याचा सुफडा साफ केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

इंडियाचे सरकार आणणारच आणी महाराष्ट्र लुटणाऱ्यांना तडीपार करणारच

या सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींवरही कडाडून टीका केली. कोल्हापूर म्हणजे अस्सल तांबडा पंधरा रसाच पाहिजे झणझणीत, लवंगी मिरचीचा झटका त्यांना द्या, असे ते म्हणाले. गायीवर बोलता तसें महागाई वारं कां नाही बोलत…

मोदीजी तुमचे मुद्दे का भटकत आहेत ? असा सवाल त्यांनी विचारला. आमच्या विरोधात जे सगळे एकवटले आहेत, मुश्रीफ यांच्यावरही आरोप केले आज मुश्रीफ बाबा कुठे गेले ? त्यांच्या पत्नी कळकळीने सांगत होत्या आम्हला गोळ्या घाला ? मैं अकेला सब पे भारी सोबत सगळे भ्रष्टचारी. पक्ष चोरलात, चिन्ह चोरलं, पवार साहेबांचं घड्याळ चोरलं अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडलं. काहीही झालं तरी माझ्या ( शिवसेना उबाठा गट) गीतातलं जय भवानी शब्द काढणार नाही असा इशाराच त्यांनी दिला. काहीही झाल्यास काढनार नाही .

शेतकऱ्यांनी तुमचं घोड काय मारलयं , अनेक वस्तूंवर जीएसटी आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांना 6-6 हजार भीक म्हणून देतंय, जीएसटीचा पैसा खिशात घालताय आणि हक्काचे पैसे देत नाहीत, इंडिया चे सरकार आणणारच आणी महाराष्ट्र लुटणाऱ्यांना तडीपार करणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांचा सूड घेण्यासाठी मी कोल्हापुरात आलोय. काँग्रेसच्या हातात मशाल आहे, चार तारखेला विजयाची तुतारी फुंकायची आहे. हुकूमशाहचे सरकार गाडून टाका असे आवाहन त्यांनी कोल्हापूरकरांना केलं.

Non Stop LIVE Update
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.