.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री 4-4 तास मी पायऱ्यांवर बसून..; आई-वडिलांच्या भांडणांविषयी रणबीर कपूर व्यक्त

'रॉकस्टार' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी अभिनेता रणबीर कपूर एका मुलाखतीत त्याच्या आई-वडिलांच्या भांडणाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या भांडणांमुळे शाळेत लाज वाटायची, असंही तो म्हणाला होता.

रात्री 4-4 तास मी पायऱ्यांवर बसून..; आई-वडिलांच्या भांडणांविषयी रणबीर कपूर व्यक्त
Rishi, Neetu and Ranbir KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: May 17, 2024 | 11:01 AM
Share

अभिनेत्री नीतू कपूर या एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. सत्तरच्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला. ऋषी कपूर आणि नीतू कपूर ही जोडी त्यावेळी चांगलीच चर्चेत होती. त्यांचं वैवाहिक जीवन अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असायचा. आता रणबीरची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होऊ लागली आहे. ‘रॉकस्टार’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी त्याने ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो आई-वडिलांच्या भांडणांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता.

‘द बिग इंडियन पिक्चर’ला दिलेल्या या मुलाखतीत रणबीर म्हणाला, “त्यावेळी मीडियामुळे एवढा फरक पडत नव्हता. कारण मीसुद्धा त्यावेळी खूप तापट होतो. मी माझ्या आईवडिलांसोबत राहतो. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तो कठीण काळ आला होता, त्याचा साक्षीदार मीसुद्धा होतो. मी ज्या बंगल्यात राहतो, तिथे माझे आई-वडिल खालच्या मजल्यावर मी आणि वरच्या मजल्यावर राहतो. मला अजूनही आठवतंय की मी पायऱ्यांवर चार-चार तास बसून असायचो. रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मी त्यांना भांडताना ऐकायचो. त्यांच्या रुममधून मला वस्तूंच्या तोडफोडीचा आवाज यायचा. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण येतो. फक्त माझे पालक सेलिब्रिटी असल्याने त्यांच्या भांडणाची चर्चा मीडियामध्ये होते.”

“आईवडिलांमधील वादाच्या बातम्यांमुळे शाळेत मला थोडीशी लाज वाटायची. अशा घटनांचा उल्लेख तुमचे मित्र तुमच्याकडे करत नाहीत, कारण ते तुमचे चांगले मित्र असतात. पण मला माहित होतं की काय घडतंय. तरीसुद्धा तुम्ही त्याला सामोरं जाता”, असं त्याने पुढे सांगितलं.

नीतू कपूर यांनी 22 जानेवारी 1980 रोजी अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर त्यांचा ‘गंगा मेरी मा’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सप्टेंबर 1980 मध्ये नीतू यांनी मुलगी रिधिमाला जन्म दिला. तर सप्टेंबर 1982 मध्ये रणबीर कपूरचा जन्म झाला. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी 2009 मध्ये नीतू कपूर यांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं होतं. तर एप्रिल 2020 मध्ये ऋषी कपूर यांचं कॅन्सरने निधन झालं.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर