AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशिक्षणाच्या नावाखाली बायको, मुलं, आईही दौऱ्यावर, उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादात

Ulhasnagar Corporators Study Tour : उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा सध्या चर्चेत आला आहे. शहरात विविध प्रश्न कायम असताना हा दौरा का काढला असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

प्रशिक्षणाच्या नावाखाली बायको, मुलं, आईही दौऱ्यावर, उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादात
Ulhasnagar Corporators Study TourImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jul 30, 2026 | 7:28 PM
Share

उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सध्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. शहरात रस्ते, पाणी, सांडपाणी आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असताना तब्बल 65 लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवक प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला गेल्याने नागरिकांमधून आणि विरोधकांकडून टीका होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नगरसेवकांचे गुवाहाटीला प्रशिक्षण

उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांसाठी 22 ते 26 जुलैदरम्यान गुवाहाटी येथे चार दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सचिव कार्यालयानुसार, या दौऱ्यासाठी सुमारे 65 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रत्येक नगरसेवकासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, भोजन, स्थानिक प्रवास, प्रकल्प भेटी, सभागृह आणि इतर सुविधांसह विमान प्रवासाचा खर्च मिळून सुमारे 74 हजार 720 रुपये खर्च अपेक्षित होता.

नगरसेवक कुटुंबीयांसह गुवाहाटीला…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये अनेक नगरसेवक कुटुंबीयांसह गुवाहाटी दौऱ्यावर गेल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हा अभ्यास दौरा होता की पर्यटन, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने मात्र हे प्रशिक्षण मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे सभाशास्त्र, प्रशासकीय कामकाज, प्रभाग विकास आणि नियोजन यांसारख्या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही पालिकेने दिली आहे.

विरोधक आक्रमक

आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेवर सुमारे 700 कोटी रुपयांचे ओझे असताना, शहरातील रस्ते, पाणी आणि इतर नागरी प्रश्न प्रलंबित असताना एवढा खर्च करून गुवाहाटीत प्रशिक्षण घेण्याची गरज काय होती, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांनी या खर्चावर आक्षेप घेत, शहराची आणि महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता 65 लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यापूर्वी प्रशासनाने विचार करायला हवा होता, असे म्हटले आहे. या खर्चाची सविस्तर माहिती विरोधी पक्ष म्हणून मागविणार असून, शहरातील विकासकामे रखडलेली असताना एवढा खर्च का करण्यात आला, याचा जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मनसेकडून या दौऱ्यावर टीका

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. शहरात रस्ते, खड्डे आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असताना नगरसेवक नातेवाईकांसह गुवाहाटीला गेले. आसाममध्ये पूरस्थिती असताना नेमके कोणते प्रशिक्षण दिले जात होते,असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत असल्याचे प्रशासन सांगते, मग 65 ते 70 लाख रुपयांचा खर्च कशासाठी करण्यात आला आणि जनतेच्या पैशाचा हिशेब कोण देणार, असा प्रश्नही मनसेने उपस्थित करत या प्रकाराचा निषेध केला आहे.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद