मिठाई नाही विष खात होते, तुकाराम मुंढेंचा दणका, 2 लाख 88 हजारांनी मिठाई नष्ट, प्रसिद्ध..
पुण्यात एफडीएकडून जोरदार कारवाई केली जात आहे. त्यातच तब्बल 8 प्रसिद्ध मिठाई सेंटरवर ही कारवाई करण्यात आली. कित्येक टन मिठाई एफडीएकडून नष्ट करण्यात आली. काही ठिकाणी परवाना नसतानाही विक्री केली जात असल्याचे पुढे आले.

तुकाराम मुंढे यांनी एफडीएचे आयुक्त म्हणून कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. भेसळखोरांची सुटका नाही. अनेक मोठ्या हॉटेलवरही कारवाई केली आहे. त्यातच आता पुण्यातील मिठाई व्यावसायिकांकडे एफडीएने आपला मोर्चा वळवला आहे. थेट अर्धा टन मिठाई नष्ट करण्यात आली. बुधवार पेठ परिसरातील मिठाई व्यावसायिकांवर एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली. अस्वच्छता, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आठ व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. त्यात आढळून आले की, काहींकडे परवानेच नसताना त्यांच्याकडून मिठाईची विक्री केली जात आहे. एफडीएने तब्बल 512.1 किलो मिठाई जप्त करण्यात आली. एफडीएने तब्बल 2 लाख 88 हजार 200 रूपयांची मिठाई नष्ट केली. ही मिठाई नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आली. 8 पथकांकडून ही मोहिम राबवण्यात आली. ज्यात ही कारवाई झाली.
बुधवार पेठ परिसरातील मे. मंगलमूर्ती पेढे, मे. श्रीमंत पेढेवाले, मे. श्री मंगल मूर्ती, मे. धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्स, मे. जय गणेश स्वीट सेंटर, मे. अथर्व स्वीट सेंटर, मे. हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र, मे. श्री कृपा दुग्धालय या दुकानांची तपासणी करण्यात आली. यापैकी श्री मंगल मूर्ती आणि मे. हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र यांच्याकडे विक्रीचा परवानाच नव्हता.
परवाना नसताना त्यांच्याकडून विक्री केली जात होती. थेट व्यवसाय बंद करण्याची नोटीस मंगल मूर्तीला मिठाई सेंटरला बजावण्यात आली. या कारवाईत अनेक प्रकारच्या मिठाई होत्या. त्यातच खव्याचे मोदक, मोतीचूर लाडू, विविध दुग्धजन्य पदार्थ याचा समावेश होता. बेसनाचे लाडूही आढळून आली. पदार्थांचे 17 नमुने घेण्यात आली. यापैकी काही प्रसिद्ध अशी मिठाई सेंटर आहेत.
श्रीमंत पेढेवाले येथून 215 किलो, श्री मंगल मूर्ती येथून 195 किलो मिठाई नष्ट करण्यात आली. हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्रावर नोंदणी प्रमाणपत्राशिवाय चालवले जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात 30 नोव्हेंबर रोजी तडतोड अर्ज दाखल केला जाईल. मात्र, एफडीएचे या पुण्यातील कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.